🕒 1 min read
भारतातील आघाडीची कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकी सतत आपल्या नवनवीन कार मार्केट मध्ये लाँच करत असते. आणि पुढेही कंपनीचा हा ट्रेंड असा सुरू राहणार आहे. आताच कंपनीने आपली हायब्रीड SUV ग्रँड विटारा लाँच केली आहे.
पुढच्या वर्षाच्या सुरुवातीलाच मारुती आपल्या दोन नवीन गाड्यांसह बाजारामध्ये धुमाकूळ घालण्यासाठी सुसज्ज आहे. या दोन्ही गाड्या SUV सेगमेंट मध्ये लाँच केल्या जातील. यामध्ये पहिली कार आहे मारुती सुझुकी बलेनो क्रॉस आणि दुसरी आहे मारुती सुझुकी 5 डोअर जिम्नी.
मारुती सुझुकी बलेनो क्रॉस (मारुती Suzuki Baleno Crass )
देशातील ऑटोमोबाईल सेक्टरमधील आघाडीची कंपनी मारुती पुढच्या वर्षी आपली मारुती सुझुकी बलेनो क्रॉस लाँच करणार आहे. ही नवीन गाडी कंपनीच्या हार्टेक्ट प्लॅटफॉर्मवर बेस्ड असणार आहे. या गाडीला BS6 बूस्टर जेट टर्बो पेट्रोल इंजिन असण्याची शक्यता आहे. त्याच बरोबर ही नवीन SUV माईल्ड हायब्रीड टेक्नॉलॉजीसह लाँच करण्यात येणार आहे. या कारमध्ये मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचा पर्याय देखील असू शकतो. मारुती आपल्या नेक्सा डीलरशिपव्दारे ही कार विकण्याचा विचारात आहे.
5 डोअर जिम्नी ( 5 Door Maruti Jimny)
मारुती सुझुकी लवकरच आपली नवीन कार बाजारात लाँच करणार आहे. ही कार 5 डोअर कार असेल. ही ऑफ-रोड कार 3850 मिमी लांब असू शकते. यामध्ये 210 मिमीचा ग्राउंड क्लिअरन्स आहे. या SUV मध्ये 1.5L K15C डुअलजेट पेट्रोल इंजन दिले जाऊ शकते जे 103bhp पॉवर आणि 137Nm टॉर्क निर्माण करू शकते. या SUV मध्ये 5 स्पीड मॅन्युअल आणि 6 स्पीड ऑटोमॅटिक गेअर बॉक्स आहेत.
महत्वाच्या बातम्या
- Shivsena । “एकनाथ शिंदे १५ आमदारांसह काँग्रेसमध्ये जाणार होते, पण…”, चव्हाणांनंतर खैरेंचा मोठा दावा
- Health Tips | बदलते हवामान तुमच्या डोकेदुखी चे कारण असेल तर, ‘ हे ‘ घरगुती उपाय नक्की करून बघा
- Supreme Court Decision | महिला अविवाहित असो वा विवाहित प्रत्येकीला सुरक्षित गर्भपाताचा अधिकार; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
- Ashish Shelar | “अशोक चव्हाण यांची एक क्लिप जाहीर केली तर…”, आशिष शेलारांचा इशारा
- Supriya Sule | “वर्षभरात केवळ १५ सिलिंडर मिळणार?” ; सुप्रिया सुळेंची आक्रमक पोस्ट
- Honda Bike | होंडा देत आहे आपल्या बाइक्सवर खास फेस्टिव्ह ऑफर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
