🕒 1 min read
नाशिक : अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या कार्यक्रमात राष्ट्रवादी नेते छगन भुजबळ यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी बोलत असताना त्यांनी देवी सरस्वतीवरुन वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यावरुन भाजप युवा मोर्चाचे पदाधिकारी आक्रमक झाले असून त्यांनी भुजबळांच्या निवास्थाना बाहेर आंदोलन केलं आहे.
भाजप युवा सेनेचे पदाधिकारी आक्रमकः
छगन भुजबळ यांच्या विरोधात भाजप पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केलं असून देवी सरस्वतीची प्रतिमा भेट देण्यासाठी त्यांनी थेट भुजबळांचं घर गाठलं. नाशिक येथील भुजबळांच्या फार्म हाऊसवर पदाधिकारी गेले असता यावेळी त्यांनी प्रतिम्याची पूजा देखील केली. मात्र, प्रवेश द्वारवरचं पोल्सांनी त्यांना रोखलं. यानंतर भुजबळांनी पदाधिकाऱ्यांन चर्चेसाठी बोलावलं असल्याचं समोर आलं आहे.
काय म्हणाले होते छगन भुजबळ :
देवी सरस्वतीला कुणी पाहिलं आहे का? असा थेट सवाल भुजबळांनी कार्यक्रमात केला आहे. तसेच पाहिलं असेल तरी फक्त 3% लोकांना सरस्वती देवीने शिकवलं असेल असं देखील भुजबळ म्हणाले होते. शाळेत सरस्वतीचा फोटो का पाहिजे? शाळांमध्ये फुले, आंबेडकर,कर्मवीर भाऊराव पाटलांचे फोटो लावा अशी मागणी भुजबळांनी केली होती.
दरम्यान, भुजबळांच्या वादग्रस्त वक्तव्याला उत्तर देत, सरस्वती, शारदा यांना कोणीच पाहिले नाही. उद्या गणपती चे फोटो पण नाकारणार का? हिंदू दैवतांचाच यांना राग का आहे असा सवाल आनंद दवे यांनी उपस्थित केला होता. दवे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली होती.
महत्वाच्या बातम्या :
- Raj Thackeray | “दीदी जिथे असतील तिथे…”, लता मंगेशकरांच्या जयंती निमीत्त राज ठाकरेंची भावूक पोस्ट
- Bacchu Kadu | बच्चू कडूंना राग अनावर! ‘ऐकून घे आधी’, म्हणत स्थानिकाच्या लगावली कानशिलात
- Eknath Shinde | एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्याला नरेंद्र मोदी अन् अमित शहांची लागणार उपस्थिती?
- Mahesh Babu | दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबूवर दुःखाचा डोंगर!
- Eknath Shinde | भारतात PFI वर बंदी! एकनाथ शिंदेंनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
