Share

Eknath Shinde | एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्याला नरेंद्र मोदी अन् अमित शहांची लागणार उपस्थिती?

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामध्ये दसरा मेळावा वरून राजकारण तापलं आहे. शिवाजी पार्क येथे दसरा मेळावा घेण्यासाठी शिंदे गटा सोबतच ठाकरे गटाची देखील परवानगी मुंबई महानगरपालिकेने नाकारली आहे. त्यामुळे ठाकरे गटांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मात्र एकनाथ शिंदे यांच्याकडे प्लॅन बी असून त्यांनी बीकेसी मैदानावर दसरा मेळावा आयोजित करण्याची तयारी सुरू केली आहे. अशातच एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे आमंत्रणः

एकनाथ शिंदे गेल्या दोन दिवसांपासून दिल्ली दौऱ्यावर आहेत. यादरम्यान त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना दसरा मेळाव्याचं निमंत्रण दिलं असल्याचं समोर आलं आहे. गुरुवारी शिंदे यांनी अमित शहा यांची भेट घेतली. शिंदे गटाचा हा पहिलाच दसरा मेळावा आहे. त्यामुळे मंचावर युतीमधील मोठ्या नेत्यांनाही आणण्याचा प्रयोग केला जाऊ शकतो. दोन्ही गटातील वाद पाहता हायकोर्ट काय निकाल देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

उद्धव ठाकरे यांच्या गटाचा प्लॅन बीः

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेत शिवाजी पार्कवरच दसरा मेळावा होणार असल्याचं ठामपणे सांगितलं आहे. त्यामुळे दसऱ्याच्या दिवशी शिवाजी पार्कवर मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. शिवाजी पार्क मैदान न मिळाल्यास जवळच असलेल्या शिवसेना भावना समोरील रस्त्यावर मेळावा घेण्याचा शिवसेनेचा प्लॅन बी असल्याचं म्हटलं जात आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!