Share

Mahesh Babu | दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबूवर दुःखाचा डोंगर!

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : दक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध सुपरस्टार महेश बाबू यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गेल्या काही दिवसांपासून महेश बाबू यांच्या आईची तब्येत खालावली होती. त्यामुळे हैदराबाद येथील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. बाबू यांच्या आईच्या तब्येतीत जास्त बिघाड होऊ लागल्याने त्यांना व्हेंटिलेटर ठेवण्यात आलं होतं. मात्र आज महेश यांच्या आईने पहाटे चार वाजता अखेरचा श्वास घेतला. या बातमीने महेश बाबू यांच्या चाहत्यांना देखील धक्का बसला आहे.

2022 च्या सुरुवातीला महेश बाबू यांनी त्यांचा भाऊ रमेश बाबू यांना गमावलं होतं. अशातच आता त्यांनी त्यांच्या जवळील ही दुसरी व्यक्ती देखील गमावली असल्याने त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. महेश बाबू यांच्या आईचं नाव इंद्रा देवी असं आहे.

महेश बाबू यांनी स्वतः ही बातमी दिली आहे. ज्येष्ठ अभिनेते कृष्णा यांच्या पत्नी आणि महेश बाबू यांच्या आई इंद्रादेवी यांचा निधन झालं आहे. इंद्रा देवी गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या आणि आज पहाटे त्यांचं निधन झालं असल्याचं निवेदनामध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, आईची तब्येत खराब असल्यामुळे महेश बाबू देखील गेल्या काही दिवसांपासून हैदराबाद मध्येच होते. अशातच त्यांच्या आईने आज सकाळी अखेरचा श्वास घेतला. हैदराबाद मध्ये आज महेश बाबू यांच्या आईवर अंत्यसंस्कार होणार आहेत.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!