नाशिक : प्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) संघटनेच्या राज्यस्तरीय नेत्यांना केंद्रीय तपास यंत्रणे एनआयए आणि ईडी यांनी अटक केली. यानंतर पुण्यात चांगलीच खळबळ उडाली होती. केंद्रीय तपास यंत्रणांने इतर ठिकाणी देखील छापेमारी केली असून अनेकांना अटक केली आहे. अशातच केंद्रीय गृहमंत्रालयाने पिएफयवर ५ वर्षांसाठी भारतात बंदी घातली आहे. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रियाः
केंद्र सरकारने पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेवर पाच वर्षांकरिता बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे महाराष्ट्र सरकार स्वागत करित आहे, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदेंनी दिली असून याबाबत त्यांनी ट्विट देखील केलं आहे.
पाहा ट्विटः
केंद्र सरकारने पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेवर पाच वर्षांकरिता बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे महाराष्ट्र सरकार स्वागत करित आहे.
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) September 28, 2022
राष्ट्रविरोधी विचार पसरवणाऱ्यांची अजिबात हयगय केली जाणार नाही, असं एकनाथ शिंदे यांनी यावेळी म्हटलं. तसंच जे लोक राष्ट्रविरोधी विचार पसरवू पाहत असतील, अशांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा देखील एकनाथ शिंदेंनी दिला आहे.
मुख्यमंत्री नाशिक दौऱ्यावरः
दरम्यान, एकनाथ शिंदे आज एक दिवसाच्या नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी गोदावरी तीरावरील तपोवन परिसरात स्वामीनारायणाची भव्य दिव्य मंदिरमधील मूर्ती प्राणप्रतिष्ठापणा सोहळ्याला त्यांनी उपस्थिती लावली.
महत्वाच्या बातम्या :
- Eknath Shinde | शिवभोजन थाळी बंद करण्याचा निर्णय अद्याप नाही – एकनाथ शिंदे
- Mangal Prabhat Lodha | “राष्ट्रीय पर्यटन पुरस्कारात महाराष्ट्राची कामगिरी अभिमानास्पद”, मंगलप्रभात लोढा
- Devendra Fadnavis | निळवंडे प्रकल्पाला लवकरच सुधारित प्रशासकीय मान्यता देणार – देवेंद्र फडणवीस
- Pankaja Munde । मोदींनी ठरवलं तरी मला संपवू शकत नाही, पंकजा मुंडे यांच्या वक्तव्याने खळबळ
- Deepak Kesarkar | मुंबई शहर आणि जिल्ह्याच्या पर्यटनासाठी ‘सहल मुंबईची’ ॲप लॉन्च
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

