Share

Tanaji Sawant | तानाजी सावंतांनी ‘त्या’ वक्तव्यावरुन मागितली माफी, म्हणाले…

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी उस्मानाबाद येथील हिंदुत्वगर्जना कार्यक्रमात मराठा आरक्षण बाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. यानंतर मराठा आरक्षण मोर्चा आक्रमक झाला असून तानाजी सावंतांनी माफी मागण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. अशातच तानाजी सावंतांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

मराठा समाजाची मागितली माफी :

ज्या मराठा समाजाच्या जीवावर मी कॉलर ताठ करून हिंडतो, त्याची एक वेळा नाही तर एक लाख वेळा माफी मागायची माझी तयारी असल्याचं तानाजी सावंत म्हणाले. मात्र, माझं वक्तव्य पूर्णपणे ऐकून घ्यावं, त्याचा विपर्यास करू नये, असं स्पष्टीकरण देखील तानाजी सावंत यांनी दिलं आहे. माफी मागण्यासाठी मला लाज वाटत नाही, पण मी म्हटलं आरक्षणाला जे डॅमेज झालं आहे, ते दुरूस्त करण्यासाठी शिंदे सरकारला वेळ द्या, माझ्या समाजाला आक्रमक होण्याचा, माझ्यावर प्रेम करण्याचा अधिकार आहे. मराठा क्रांती मोर्चा, सकल मराठा, जो जो मराठा कार्यकर्ता आहे. त्या अगदी पाळण्यातल्या बाळापासून 90 वर्षांच्या आजोबापर्यंत सर्वांची मी माफी मागतो, अशा शब्दांमध्ये तानाजी सावंतांनी माफी मागितली आहे.

देवेंद्र फडणवीसांनी आरक्षण मिळवून दिलंः

2020 च्या वेळी मराठा आरक्षण रद्द झालं. देवेंद्र फडणवीसांनी आरक्षण मिळवून दिलं. त्याचा काही तरुणांना फायदाही झाला. पण आरक्षण रद्द झाल्यापासून ते कालचं सरकार येईपर्यंत कोणत्याही मराठा नेत्यानं यासंदर्भात भाष्य केलं नाही, पण शिंदे-फडणवीस सरकार आलं, तशा विकृती जागृत झाल्या. मग हे आरक्षण यातून मिळालं पाहिजे, ते आरक्षण त्यातून मिळालं पाहिजे, अशा मागण्या सुरु झाल्या असल्याचं यावेळी सावंत म्हणाले.

…तर हा तानाजी सावंत आपल्या पदाचा राजीनामा देणारः

दरम्यान, 2024 पर्यंत आरक्षण नाही मिळालं तर हा तानाजी सावंत आपल्या पदाचा राजीनामा देऊन मराठा समाजाबरोबर मोर्चात तुमच्याबरोबर शामिल होईल, असं आश्वासन तानाजी सावंत यांनी दिलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!