नुकतेच नामिबियातून आणलेले 8 चित्ते भारतातील मध्य प्रदेशात सोडण्यात आले आहेत. त्यानंतर सोशल मीडियावर त्याच्याबद्दलचे अनेक व्हिडिओ समोर येत आहेत. भारतीय युजर्स हे पाहण्यात मोठी उत्सुकता दाखवत आहेत. चित्ता हा पृथ्वीवरील सर्वात वेगाने धावणाऱ्या प्राण्यांपैकी एक आहे. त्याचबरोबर हा मांसाहारी प्राणी आहे. नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे . जे पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले.
सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे. या व्हिडिओमध्ये, पृथ्वीवर सर्वात वेगवान धावणारा चित्ता पृथ्वीवरील सर्वात मंद धावणाऱ्या कासवाशी मैत्री करताना आणि त्याच्यासोबत एकाच ताटात अन्न खाताना दिसत आहे. जे पाहून युजर्सचे डोके चक्रावून गेले आहे.
व्हायरल व्हिडिओ
हा व्हिडिओ सोशल मीडियावर carsonspringswildlife नावाच्या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. वन्यजीव अभयारण्यात लहानपणापासूनच प्राण्यांचे इतर अनेक प्राण्यांसोबत संगोपन केले जाते. अशा परिस्थितीत ते एकमेकांचे चांगले मित्र बनतात आणि नंतर मोठे होतात आणि एकमेकांवर कधीही हल्ला करत नाहीत. सोशल मीडियावर असे व्हिडिओ अनेकदा आपल्याला बघायला मिळतात.
https://www.instagram.com/p/CiUnTPkgHXW/
व्हिडिओला 32 मिलियन पेक्षा अधिक व्ह्यूज
सध्या कासवासोबतही असाच काहीसा प्रकार घडला आहे. कासावाचा मित्र चित्ता आपल्या मित्राला इजा करण्याऐवजी त्याच्यासोबत एकाच भांड्यातून अन्न खाताना दिसत आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
महत्वाच्या बातम्या
- Uday Samant | वेदांता गेल्यानंतर उदय सामंत गुजरात दौऱ्यावर, CM सोबत करणार चर्चा
- Rohit Pawar | शिवसेनेच्या ‘जनआक्रोश मोर्चा’वर रोहित पवारांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…
- Chandrakant Patil | “… त्यांच्या म्हणण्याचा तसा अर्थ नव्हता”, तानाजी सावंतांच्या ‘त्या’ वक्तव्यावर चंद्रकांत पाटलांचं स्पष्टीकरण
- Hindutva Chapter One Trailer | ‘हिंदुत्व चॅप्टर वन – मैं हिंदू हूं’ चा ऑफिशियल ट्रेलर रिलीज
- Keshav Upadhye | “पेंग्विन सेनेच्या प्रमुखानी हिंदुत्व तर सोडलेच आहे आता विचारही पवार सोनियांचा सांगणार”
- Tanaji Sawant | “तानाजी सावंतानी माफी मागावी”, मराठा क्रांती मोर्चा आक्रमक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

