🕒 1 min read
मुंबई : महाविकास आघाडी सरकार यांच्या काळात गोगरिबांसाठी शिवभोजन थाळी सुरू करण्यात आली होती. मात्र, ही योजना आता बंद करण्यात येणार असल्याची चर्चा रंगली आहे. शिवभोजन थाळी योजनेत गैरव्यवहार झाल्याचा संशय एकनाथ शिंदे-देवंद्र फडणवीस सरकारला आहे.
महाविकास आघाडी सरकार यांच्या कार्यकाळात घेतलेल्या काही निर्णयांना स्थगितीः
एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर राज्यात सत्तांतर झाली आणि शिंदे-फडणवीस सरकार आली. यानंतर महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात घेतलेल्या काही निर्णयांना स्थगिती देण्यात आली. तर काही निर्णयांमध्ये बदल करण्यात आले आहेत.
शिवभोजन थाळी बंद करण्यासाठी प्रस्तावः
दरम्यान, शिवभोजन थाळी बंद करण्यासाठी प्रस्ताव मुख्यमंत्री शिंदे यांच्यासमोर ठेवण्यात आला आहे. मात्र, याबाबत शिंदे सरकारने अद्याप निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे मंत्रीमंडळ बैठकीत काय निर्णय होणार याकडे सर्वांच लक्ष लागले आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारच्या काळात ही शिवभोजन थाळी सुरू करण्यात आली होती. राज्यात एक लाख 88 हजार 463 एवढ्या थाळ्यांची विक्री होते. शिवभोजन थाळीसाठी विविध ठिकाणी केंद्र सुरू करण्यात आली आहेत. या केंद्रांना राज्य सरकारकडून विविध मदत दिली जाते.
महत्वाच्या बातम्या :
- Uday Samant | वेदांता गेल्यानंतर उदय सामंत गुजरात दौऱ्यावर, CM सोबत करणार चर्चा
- Rohit Pawar | शिवसेनेच्या ‘जनआक्रोश मोर्चा’वर रोहित पवारांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…
- Chandrakant Patil | “… त्यांच्या म्हणण्याचा तसा अर्थ नव्हता”, तानाजी सावंतांच्या ‘त्या’ वक्तव्यावर चंद्रकांत पाटलांचं स्पष्टीकरण
- Hindutva Chapter One Trailer | ‘हिंदुत्व चॅप्टर वन – मैं हिंदू हूं’ चा ऑफिशियल ट्रेलर रिलीज
- Keshav Upadhye | “पेंग्विन सेनेच्या प्रमुखानी हिंदुत्व तर सोडलेच आहे आता विचारही पवार सोनियांचा सांगणार”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
