Share

Ravi Rana | अमरावतीतील बेपत्ता मुली प्रकरणासंबंधी रवी राणांनी पोलीस आयुक्तांवर केले ‘हे’ गंभीर आरोप

Published On: 

🕒 1 min read

अमरावती : अमरावतीमधील तरूणी बेपत्ता झालेलं प्रकरण खूप गाजतं आहे. या सगळ्याला खासदार नवणीत राणा यांनी  लव्ह जिहादचे स्वरूप देण्याचा प्रयत्न केला होता.तसेच त्यांनी पोलिसांचा अपमान केला असल्याचं म्हणत त्यांच्यावर अनेकांनी टीकाही केली आहे. तर अशातच नवनीत राणा यांचे पती आणि आमदार रवी राणा यांनी या प्रकरणासंबंधी पोलीस आयुक्त यांच्यावर गंभीर आरोप केले असल्याचं समजतं आहे.

रवी राणा यांचा आरोप-

अमरावतीतील बेपत्ता मुलीचं प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. असा आरोप आमदार रवी राणा यांनी पोलीस आयुक्त आरती सिंह यांच्यावर केला आहे. त्यांच्या या आरोपामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. रवी राणा म्हणाले की, अमरावती पोलिसांकडे पीडित कुटुंब खूप वेळा गेले. परंतू पोलिसांनी त्यावर कोणतही अॅक्शन घेतली नाही.

त्याचबरोबर आरती सिंह यांनी जो आरोपी पकडला होता त्या आरोपीचा खुलासा का केला नाही? जेव्हा ती मुलगी गायब होती तेव्हा हे लोकं पुढे का आले नाही?, असे सवाल देखील या ठिकणी रवी राणा यांनी उपस्थित केले आहेत. पोलिसांचा नेहमी आम्ही आदर आणि सन्मान केला आहे. त्यांना मी माझा पगार दिलेला आहे. शहिदांसाठी पोलिसांसाठी नेहमी रक्तदान आयोजन केलं, असं म्हणत पोलिसांचा अपमान करणं आमच्या रक्तात नसल्याचंही रवी राणा यांनी सांगितलं आहे.

तसेच, गेले अडीच वर्ष उद्धव ठाकरे सरकार होते. मी शेतकऱ्यांसाठी आंदोलन केलं.त्या आंदोलनात मला दिवाळीच्या तीन दिवस आधी अटक केली. जेव्हा जेव्हा मी जनहिताचे प्रश्न मांडले तेव्हा आयुक्त आरती सिंह यांनी नेत्यांना खूश करण्यासाठी आमच्यावर गुन्हे दाखल केले असल्याचं राणा यांनी म्हटलं आहे. एवढंच नाहीतर आमच्यावर गुन्हे दाखल करण्याची पूर्ण सुपारी आरती सिंह यांनी घेतली असल्याचा आरोपही राणा यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!