🕒 1 min read
मुंबई : जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील न्हावी येथे जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेचा भूमिपूजन सोहळा, मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पार पडला. यावेळी वारंवार होणाऱ्या टिकांवरून गुलाबराव पाटील यांनी जोरदार टीका केली.
शिवसेना कोणाची यावरून जो येतो तो आमदार आमच्यावर बोलतो. मात्र, शिवसेना आमचीच आहे, आम्ही शिवसेना सोडलेली नाही, आम्ही काय कमळावर विजयी झालो का? असा सवाल उपस्थित करत ज्यांच्या सोबत आमचं 25 वर्षे लफडं होतं, त्याला आम्ही आय लव यू म्हटलं, असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.
टीका करणाऱ्यांना आतापर्यंत मी बोलत नव्हतो, चुपी साधली होती, मात्र ज्याची वाॅर्डातून निवडून यायची देखील लायकी नाही तो सुद्धा आता आम्हाला बोलू लागला आहे, असं म्हणत गुलाबराव पाटील यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला.
आमदार होणं सांध झाल राहिलेलं नाही, पहिल्यांदा कोणीही आमदार होतं, मात्र पुन्हा आमदार होणं कठीण आहे, ये पब्लिक है ये सब जानती है, लोक आता वेडे बनणारे नाहीत. ज्याप्रमाणे भाजीपाला निवडून घेतला जातो, त्याचप्रमाणे पाच वर्षांसाठी आमदार देखील निवडत असल्याचं गुलाबराव पाटील म्हणाले.
दरम्यान आम्ही बाळासाहेबांना सोडलेलं नाहीये, ना दिघेंना सोडलं आहे, ना पक्ष सोडला, आम्ही भगवा झेंडा सोडलेला नाही. त्यामुळे शिवसेना आमचीच आहे. आम्ही फक्त आमच्या सोबत जो राहील तोच आमचा, असं बोललो. मात्र, आता मैदानावरून लढाया, दसरा मेळाव्यावरून लढाया, काय चालले, अशा खंत वादांवरून गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी अथवा काँग्रेसवर टीका करायला आपण इथे आलेलो नसल्याचं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे. कारण मागच्या अडीच वर्ष त्यांच्यासोबत लफडं होतं, आम्ही राजकारणाचा सत्ता खेळलो, जर झालं नसतं तर राम बोलो भाई राम बोलो असं होऊन कार्यक्रम लागला असता आणि घरी बसवं लागलं असतं, असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्याः
- Shivsena | “भाजपकडे नेहमी मिशन्स असतात पण मूळ समस्यांपासून ते मिसिंग असतात”, शिवसेनेकडून पलटवार
- Dhananjay Munde | “बाह्य संस्थेमार्फत नेमलेल्या बस चालकांना शासकीय सेवेत सामावून घ्यावं अन्यथा…”, धनंजय मुंडे
- Devendra Fadanvis | मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांसंदर्भात देवेंद्र फडणवीसांचे मोठे वक्तव्य म्हणाले…
- Amit Shaha | “उद्धव ठाकरे यांनी आपल्याला धोका दिला, आता आपण…”, अमित शहांचं पदाधिकाऱ्यांना आवाहन
- Gulabrao Patil | संजय राऊत म्हणजे चहा पेक्षा किटली गरम – गुलाबराव पाटील
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
