🕒 1 min read
मुंबई : काही दिवसांपूर्वी भाजप पक्षाचे आमदार प्रशांत बंब यांनी शिक्षकांसंबंधी एक वक्तव्य केलं होतं. तेव्हापासून ते चर्चेत असल्याचंं पाहायला मिळतं आहे. अशताच त्यांनी आज पत्रकारपरिषद घेत, आपली भूमिका माध्यमांसमोर स्पष्ट केली आहे. 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिना निमित्त गावात राहत असलेल्या शिक्षकांचा मी स्वत: सन्मान करणार असल्याचं प्रशांत बंब यांनी म्हटलं आहे.
प्रशांत बंब यांचे वक्तव्य-
सरपंच, शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष, सदस्य किंवा पालकांनी देखील शिक्षकांच्या घरी जाऊन त्यांचे आभार मानावेत, असं आवाहनही त्यांनी सर्वांना केलं आहे. त्याचबरोबर मात्र शिक्षक जर गावात राहत नसतील तर ही बाब मी शिक्षण अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून याबाबत शिक्षणमंत्री, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याकडे तक्रार करणार असल्याचेही आमदार बंब यांनी सांगितले आहे.
प्रशांत बंब म्हणाले की, कोणालाही वाटतं त्याची मूलं चांगल्याप्रकारे शिकले पाहिजेत, त्यांना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे. याशिवाय यामागे विविध कारणं देखील असतात. इतकच नाही तर शिक्षकांना देखील वाटतं की त्यांची मुलं चांगली शिकावी. आपल्याला आश्चर्य वाटले सरकारने प्रचंड व्यवस्था तयार केलेल्या असल्याचं त्यांनी सांगितलं.
मी जिल्हापरिषदेच्या शाळेत शिकलेलो आहे-
पुढे त्यांनी असंही म्हटलं की, मी जिल्हापरिषदेच्या शाळेत शिकलेलो आहे, त्यावेळी इतकीच कामं होती, इतक्याच सगळ्या बाबी होत्या. उलट डिजीटल युगात आता सगळ्या बाबींचे संगणीकरण झाल्याने त्यांना कमी कामे करावी लागतात.या सगळ्या व्यवस्थेतून आपण सगळेजण निघालेलो असताना, आता हे काय सांगतात की आम्हाला शिक्षक कमी आहेत. परंतु आपण जर पटसंख्या बघितली, राज्यातील शिक्षकांची संख्या आणि विद्यार्थ्यांची संख्या बघितली तर एका वर्गात आपण किती विद्यार्थी ठेवावे याचा जर विचार केल्यास शिक्षकांची संख्या जास्त निघेल.
महत्वाच्या बातम्या :
- PAK vs HK | पाकिस्तान विरुद्ध हॉककाँग आज सामना, ‘करो या मरो’ची परिस्थिती
- Ambadas Danve | शाळेत दाखला अन् मुले शिक्षणासाठी मदरशात ; अंबादास दानवे यांनी घेतली दखल
- Ajit Pawar | एकनाथ शिंदे चूक की बरोबर, जनताच ठरवेल- अजित पवार
- Breaking News | काँग्रेस पक्षातील मोठा नेता शिंदे गटामध्ये येण्याची शक्यता
- Rashmika Mandana | ‘या’ प्रसिद्ध क्रिकेटपटू सोबत रश्मिका मंदनाचा नवीन चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
