🕒 1 min read
बारामती : एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत युती करून राज्यामध्ये सरकार स्थापन केलंं आहे. तेव्हापासून शिंदे गट आणि महाविकास आघाडी पक्षनेत्यांचा गट, असे दोन गट दिसून येत आहे. शिंदे गटाला विरोधी पक्षातील नेते ‘गद्दार’ म्हणत असतात. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी एक वक्तव्य केलं आहे. एकनाथ शिंदे चूक की बरोबर हे जनता ठरवेल, असं ते म्हणाले आहेत.
अजित पवार यांचे वक्तव्य-
एकनाथ शिंदे चूक की बरोबर हे जनताच ठरवेल, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. बारामतीमध्ये एका कार्यक्रमाला अजित पवार उपस्थित होते. त्यावेळी ते बोलत होते. परंतू त्यांनी केलेल्या या वक्तव्याची चर्चा संपूर्ण महाराष्ट्र राज्यभर चालली आहे.
लोकशाहीत अशा घटना होतच असतात-
एकनाथ शिंदेंनी बंड करत शिवसेनेतला एक मोठा गट बाजूला काढला. या घटनेच्या मी खोलात जाणार नाही. लोकशाहीत अशा घटना होतच असतात. ते योग्य की अयोग्य हे सर्वसामान्य जनता निवडणुकीच्या माध्यमातून ठरवेल, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, बारामती मधील नटराज नाट्यकला मंडळाच्या कलादानाचे तसेच बारामती गणेश फेस्टिवलचं उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते झालं. यावेळी त्यांनी राज्यात सत्ता येत जात राहते, मात्र याचा परिणाम बारामतीच्या विकासावर होणार नसल्याचं सांगितलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Sudhir Mungantiwar | मंत्रिमंडळात आणखी 23 मंत्री होऊ शकतात – सुधीर मुनगंटीवार
- Amit Shah | अमित शाह देखील राज ठाकरेंना भेटण्याची शक्यता, भाजप-मनसे युती होणार?
- Ajit Pawar | बारामतीच्या विकासावर राज्यातील सत्तांतराचा परिणाम होणार नाही! – अजित पवार
- Nana Patole | “ईडी सरकारच्या वागण्यातून स्वत:ची…” ; नाना पटोलेंची टीका
- INS Vikrant | भारताची सर्वात मोठी युद्धनौका आएनएस विक्रांत आजपासून नौदलाच्या सेवेत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
