Share

PAK vs HK | पाकिस्तान विरुद्ध हॉककाँग आज सामना, ‘करो या मरो’ची परिस्थिती

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : पाकिस्तान आणि हाँगकाँग यांच्यात आशिया चषक 2022 चा 6 वा सामना आज शारजाह क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. दोन्ही संघांसाठी हा करा किंवा मरोचा सामना आहे. शारजाहवर जिंकणारा संघ भारत, अफगाणिस्तान आणि श्रीलंकेसह सुपर-4 मध्ये स्थान मिळवेल. पाकिस्तान आणि हाँगकाँगमध्ये आतापर्यंत 1-1 सामने झाले असून दोन्ही संघांना भारताकडून पराभव पत्करावा लागला आहे. भारताने पाकिस्तानचा 5 विकेट्सने पराभव केला तर हाँगकाँगचा 40 धावांनी पराभव झाला.

पाकिस्तान विरुद्ध हाँगकाँग आशिया चषक सामना आज (शुक्रवार, 2 सप्टेंबर) शहारझा क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल, तर या सामन्याचा नाणेफेक संध्याकाळी 7 वाजता होईल. तुम्ही स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाकिस्तान विरुद्ध हाँगकाँग आशिया कप 2022 मधील 6 वा सामना थेट पाहू शकता.

हाँगकाँगच्या कर्णधाराने मागितली बाबर आझमची मदत-

हाँगकाँगला अजूनही आशिया चषकाच्या सुपर फोरमध्ये पोहोचण्याची संधी आहे. मात्र यासाठी संघाला बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान संघाचा पराभव करावा लागणार आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी हाँगकाँगचा कर्णधार निजाकत खानने बाबर आझमची भेट घेतली आहे. दोन्ही कर्णधारांमध्ये काहीशी चर्चा झाली ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

निजाकत खान आणि बाबर आझम यांच्या भेटीचा व्हिडिओ पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये निझाकत ‘आम्हाला काही टिप द्या’ असे म्हणताना ऐकू येत आहे. बाबर आझमने निजाकतला निराश केले नाही. पाकिस्तानच्या कर्णधाराने निजाकतला विश्वास ठेवण्यास सांगितले.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!