मुंबई : एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत युती करून राज्यामध्ये सरकार स्थापन केलंं आहे. तेव्हापासून शिंदे गट आणि महाविकास आघाडी पक्षनेत्यांचा गट, असे दोन गट दिसून येत आहे. शिंदे सरकार स्थापन होऊन जेमतेम दोन-अडीच महिन्या आता होत आहेत. परंतू आताही महाविकास आघाडी पक्षातील नेत्यांकडून शिंदे गटातील नेत्यांना ‘गद्दार’ म्हणून बोललं जात आहे. अशातच एक मोठी बातमी समोर आली आहे. काँग्रेस पक्षातील ज्येष्ठ नेता शिंदे गटात सामील होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या माहितीमुळे महाराष्ट्र राज्यातील राजकीय वर्तुळामध्ये चांगलीच खळबळ उडाली असल्याचं पाहायला मिळतं आहे.
काँग्रेस पक्षातील ‘हा’ नेता येणार शिंदे गटात-
शिंदे गटामध्ये जाणारा नेत्या नेमका कोण आहे, हे अद्याप समजलेलं नाहीय. तसेच काँग्रेसच्या या ज्येष्ठ नेत्यासोबत काँग्रेस पक्षातील आणखिन 9 आमदार शिंदे गटामध्ये जाणार असल्याचंही बोललं जात आहे. या बातमीमुळे काँग्रेस पक्षाला मोठा धक्काच बसला असल्याचं दिसून येतं आहे.
तसेच, संपूर्ण मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या दिवळीपर्यंत होणार आहे. त्यामुळे इतर पक्षातील नेते शिंदे गटात सामील होत असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे सामील होणाऱ्या नेत्यांना या मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळणार की नाही हे काही दिवसातच आपल्या सर्वांना समजणार आहे.
कधी होणार मंत्रीमंडळाचा पूर्ण विस्तार?-
दरम्यान, मंत्रिमंडळाच्या संदर्भात नुकतीच राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी एक वक्तव्य केलं आहे. राज्यामध्ये 43 मंत्री असतात. त्यापैकी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसहीत शिवसेना-भाजपाचे प्रत्येकी 9 असे 20 मंत्री सध्या मंत्रिमंडळात आहे. लवकरच मंत्रिमंडळात अन्य 23 मंत्र्यांचा समावेश होईल असं सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं.
महत्वाच्या बातम्या :
- Sudhir Mungantiwar | मंत्रिमंडळात आणखी 23 मंत्री होऊ शकतात – सुधीर मुनगंटीवार
- Amit Shah | अमित शाह देखील राज ठाकरेंना भेटण्याची शक्यता, भाजप-मनसे युती होणार?
- Ajit Pawar | बारामतीच्या विकासावर राज्यातील सत्तांतराचा परिणाम होणार नाही! – अजित पवार
- Nana Patole | “ईडी सरकारच्या वागण्यातून स्वत:ची…” ; नाना पटोलेंची टीका
- INS Vikrant | भारताची सर्वात मोठी युद्धनौका आएनएस विक्रांत आजपासून नौदलाच्या सेवेत


