🕒 1 min read
बीड : शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या अपघाती निधनानंतर संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरलीय. भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी आज मेटे कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी पाटील यांनी मेटे यांच्या कार्याचा आणि त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच घटनेची सखाेल चाैकशी हाेऊन सत्य समाेर आलं पाहिजे असं नमूद पाटील यांनी केले.
आम्ही दाेघांनी 25 वर्ष काम केलं आहे. आमच्यात नेहमी विविध विषयांवर चर्चा हाेत असे. विधान परिषदेत देखील मी त्यांच्यासमवेत काम केले आहे. आठ दहा दिवसांपुर्वीच ते माझ्या मुंबईतील निवासस्थानी भाेजनासाठी येणार हाेते. परंतु कामामुळं त्यांना शक्य झालं नाही. त्यांनी 15 नंतर नक्की येईन असं मला सांगितलं हाेते. असेही भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले.
महत्वाच्या बातम्या :
- Ajit Pawar | सत्ताधाऱ्यांच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार, अजित पवारांची राज्य सरकारवर टीका
- Vinayak Mete | विनायक मेटेंचा घातपातच?, शिवसंग्रामच्या कार्यकर्त्याची ऑडिओ क्लिप व्हायरल
- Vinayak Mete Wife | विनायक मेटे अपघाताला वेगळं वळण; अपघात की घातपात, मलाही संशय – ज्योती मेटे
- ITBP bus accident | जवानांना घेऊन जाणाऱ्या बसचा अपघात; 7 जवानांचा मृत्यू तर काही जण गंभीर जखमी
- Ajit Pawar | सत्ता आली म्हणून मस्ती आली का? ; अजित पवार शिंदे गटावर संतापले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
