🕒 1 min read
मुंबई : सध्या मनी लाँड्रींगप्रकरणी नवाब मलिक हे तुरुगांत असलेले राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या अडचणीत सातत्याने वाढ होत आहे. अमली पदार्थ नियंत्रण कक्षाचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी नवाब मलिक यांच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. मलिक यांनी जात पडताळणी समितीकडे समीर वानखेडे यांच्याविरोधात तक्रार केली होती. मात्र नुकतीच जातपडताळणी समितीकडून वानखेडे यांना क्लीन चिट देण्यात आली आहे. त्यामुळे आता वानखेडे यांनी जास्त आक्रमक भूमिका घेत ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत नवाब मलिकांवर गुन्हा दाखल केला आहे.
मलिक यांनी जात पडताळणी समितीकडे समीर वानखेडे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती कि वानखेडे हे मुस्लिम समाजातील आहेत. त्यांनी खोटे कागदपत्र तयार केले आहेत. मात्र या प्रकरणावर वानखेडे यांना क्लीन चिट देत, ते मुस्लीम नसल्याचा निष्कर्ष जातपडताळणीने समितीने काढला आहे. तर आता समीर वानखेडे यांनी मालिकांविरोधात अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. गोरेगाव पोलीस ठाण्यात मलिक यांच्याविरुद्ध अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यासंदर्भात वानखेडे यांनी फिर्याद दिली असून पोलिसांनीही गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा एससी, एसटी कायद्यांतर्गत दाखल करण्यात आला आहे. तर या प्रकरणाचा तपास लवकरच सुरु होणार आहे.
वानखेडे हे हिंदूच
समीर वानखेडे यांच्या वडिलांनी मुस्लीम धर्म स्वीकारला असल्याचे तक्रारीत म्हटले होते. मात्र पुरावे आणि चौकशीअंती हा आरोप सिद्ध होत नाही. तसेच यासंदर्भात पुरावेही सापडलेले नाहीत, असे समितीने निकालपत्रात स्पष्ट केले आहे. त्यामुळे वानखेडे यांचे ‘हिंदू महार’ हे जात प्रमाणपत्र वैध असल्याचा निष्कर्ष जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने दिला आहे. तर या निकालानंतर वानखेडे यांनी सत्यमेव जयते, असे ट्विट केले होते. त्यामुळेच वानखडे जरी या प्रकरणातून सुटले असले तरी नवाब मलिक मात्र जास्त अडचणीत येणार आहेत.
महत्वाच्या बातम्या:
- Raosaheb Danve| “…तिथे फोनवर बोलताना ‘वंदे मातरम’ म्हणणं चुकीचं नाही”; दानवेंनीही केले समर्थन
- Santosh Bangar । “…तर मी कायदा हातात घेणारच”; संतोष बांगर यांचे गंभीर विधान
- Shivendra Raje Bhosale | गणेशोत्सवात डॉल्बी सुरू करा ; शिवेंद्रसिंहराजेंची देवेंद्र फडणवीसांना मागणी
- Vinayak Raut । “उदय सामंत टक्केवारी घेऊन कामं करतात,..”; विनायक राऊतांचे खळबळजनक आरोप
- Sudhir Mungantiwar | श्वास कसा घ्यावा तुम्ही सांगणार का? आव्हाडांच्या वक्तव्यावर सुधीर मुनगंटीवारांचा पलटवार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
