🕒 1 min read
मुंबई : आयसीसी टी-२० विश्वचषकापूर्वी भारतीय क्रिकेट संघाला आपला मजबूत संघ तयार करण्यासाठी फारसा वेळ उरलेला नाही. या मोठ्या स्पर्धेपूर्वी आशिया चषक स्पर्धा महत्त्वाची मानली जात आहे. सध्या टीम इंडियात स्थान मिळवण्यासाठी अर्शदीप सिंग आणि आवेश खान या दोन युवा गोलंदाजांमध्ये स्पर्धा सुरू आहे. भारताचे माजी सलामीवीर संजय मांजरेकर यांनी सांगितले की, दोघांपैकी कोणता खेळाडू ऑस्ट्रेलियाला जाणाऱ्या विमानामध्ये स्थान मिळवू शकेल? या युवा गोलंदाजांनी आयपीएल सारख्या बलाढ्य स्पर्धेत चमकदार कामगिरी केलेली आहे.
मांजरेकर म्हणाले की, “भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलियात खेळल्या जाणार्या टी-२० विश्वचषकावर लक्ष्य ठेवून वाटचाल करत आहे. या मोठ्या स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी अनेक खेळाडू उत्सुक आहेत. त्यामुळे युवा खेळाडूंचाही चांगलाच कस लागणार आहे. यादरम्यान भारताचे दोन युवा गोलंदाज भारतीय संघाचे दर ठोठावत आहेत. या दोघांपैकी एकाला टी-२० विश्वचषकासाठी संघात स्थान मिळवण्यासाठी संधी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या जी शर्यत सुरू आहे ती ऑस्ट्रेलिया टी-२० साठी आहे. प्रत्येक खेळाडूला भारतीय संघात स्थान मिळवायचे आहे. .”
वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-२० मध्ये अर्शदीपने चांगली गोलंदाजी केली आहे. मांजरेकर म्हणाले की, “मला असे वाटते की, या शर्यतीत अर्शदीप सिंगने आवेश खानला मागे टाकले आहे. आवेश खान सध्या त्याच्यापेक्षा थोडा मागे असल्याचे दिसत आहे. त्यामुळेच ही शर्यत आणखीनच मजेशीर झाली आहे. या दोघांपैकी एकाला टी-२० विश्वचषकासाठी संघात स्थान मिळवण्यासाठी संधी मिळण्याची शक्यता आहे. असे मांजरेकर यांनी म्हटले आहे.
मांजरेकर पुढे म्हणाले की, “आवेश खानला यावेळी अर्शदीपने थोडा मागे सोडले आहे. मी यामागचे कारणही सांगेन की, संघातील आवेश खानची भूमिका काय आहे ते अर्शदीप करत आहे. आवेश नवीन चेंडूने सुरुवात करतो, मात्र नवीन चेंडू आणि त्यानंतर डेथ ओव्हर्समध्ये संघासाठी चांगली गोलंदाजी. यावेळी अर्शदीपनेही या दोन्ही गोष्टी केल्या आहेत.”
महत्त्वाच्या बातम्या :
- Devendra Fadnavis । “ज्यांचे दोन नेते जेलमध्ये…”; मंत्रिमंडळ विस्तारावरून राष्ट्रवादीने केलेल्या आरोपांवर फडणवीसांचं प्रत्युत्तर
- Narendra Modi | काय सांगता! एका वर्षात PM नरेंद्र मोदी ‘मालामाल’! गांधीनगरची जमीन केली दान
- Rupali Patil | “आता संजय राठोडांना चित्राताई राखी बांधायला जाणार”- रुपाली पाटील यांचा खोचक टोला
- Uddhav Thackeray | उद्धव ठाकरे अजूनही विधान परिषदेवर! आमदारकीचा राजीनामा दिलाच नाही, काय आहे कारण ?
- Kishori Pednekar | मंत्रिपदाची शपथ घेताना एकाही मंत्र्याने बाळासाहेबांचे नाव घेतले नाही; किशोरी पेडणेकर आक्रमक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
