🕒 1 min read
Kishori Pednekar | मुंबई : आज शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. या विस्तारावर शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी या मुद्द्यावरून सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. तसेच शिंदे गटातील आमदार संजय राठोड यांची मंत्रीपदी वर्णी लागल्यानंतर राजकीय वर्तुळातून मोठ्या प्रमाणात सरकारवर टीका होण्यास सुरवात झाली आहे. पेडणेकरांनी या मुद्द्यावरून देखील सरकारवर हल्लाबोल केला आहे.
पेडणेकर माध्यमांसमोर बोलताना म्हणाल्या कि, पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणानंतर संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला होता. मात्र, आता त्याच राठोड यांना पुन्हा मंत्री करण्यात आलं आहे, त्यावेळी भाजपानेही रानं उठवलं होतं, चित्रा वाघ यांनी तर आभाळ-पताळ एक केलं होतं. मात्र, आता राठोड यांना मंत्री करण्यात आलं आहे. त्यामुळे तेंव्हा बडबड करणारे पोपट आता कुठं गेले, असा खोचक टोला त्यांनी भाजपाला लगावला आहे.
तसेच पुढे पेडणेकर म्हणाले कि, आम्ही हा मंत्रीमंडळ विस्तार काळजीपूर्वक बघत होतो. यावेळी कोणीही बाळासाहेब किंवा स्वत:च्या आईचे नाव घेतले नाही. मागच्या वेळी अनेकांनी बाळासाहेबांचे तर कोणी आपल्या आईंचे नाव घेतले होते. तसेच यापैकी कोणीही छत्रपती शिवाजी महाराजांचे नावही घेतले नाही. ही वाटचाल नेमकी कोणत्या दिशेने सुरू आहे, असेही त्या म्हणाल्या.
दरम्यान, आज शिंदे गटाकडून दीपक केसरकर, गुलाबराव पाटील, उदय सामंत, अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे, दादा भुसे, शंभुराज देसाई, तानाजी सावंत आणि संजय राठोड यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. तर भाजपकडून चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, मंगलप्रभात लोढा, राधाकृष्ण विखेपाटील, सुरेश खाडे, विजयकुमार गावित, अतुल सावे आणि रवींद्र चव्हाण यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली.
महत्वाच्या बातम्या :
- Nana Patole | हे सरकार महाराष्ट्रासाठी आहे की गुजरातसाठी – नाना पटोले
- Rupali Patil | “…त्यांनाच मंत्रिपदं देताना लाज वाटली नाही का?”; रुपाली पाटील संतापल्या
- Maharashtra Cabinet Expansion : भाजप-शिंदे मंत्रिमंडळात 44 हजार कोटींचा मालक झाला पहिल्यांदा ‘मंत्री’!
- Kishori Pednekar | माविआच्या काळात राठोडांवर टीका करणारे पोपट आता कुठं गेले?; पेडणेकरांचा खोचक टोला
- Asia Cup 2022 : विराट कोहलीसाठी यंदाचा आशिया चषक राहणार आव्हानात्मक; वाचा सविस्तर…!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

