Share

Devendra Fadnavis । “ज्यांचे दोन नेते जेलमध्ये…”; मंत्रिमंडळ विस्तारावरून राष्ट्रवादीने केलेल्या आरोपांवर फडणवीसांचं प्रत्युत्तर

Published On: 

🕒 1 min read

Devendra Fadnavis | मुंबई : सुमारे दीड महिन्याच्या प्रतीक्षेनंतर अखेर आज महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे. आज पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आला आहे. शिंदे गटातील आणि भाजपातील एकूण १८ आमदार आज मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे यात एकही अपक्ष आमदाराचे नाव नाही. तर या मंत्रिमंडळात एकही महिला मंत्री नाही. तसेच मंत्री अब्दुल सत्तार आणि मंत्री संजय राठोड यांच्या नावांचा समावेश मंत्रिमंडळात आहे. या मुद्यांवरून विरोधकांकडून आजच्या मंत्रिमंडळ विस्तारावर जोरदार टीका सुरु आहेत. मात्र विरोधकांच्या टीकांना आता स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिल आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले कि, ज्यांचे नेते सध्या जेलमध्ये असतील. तसेच ज्यांच्या अनेक नेत्यांवर खटले सुरू असतील अशा पक्षाला बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. त्यांनी अगोदर आरसा पाहावा, असे फडणवीस म्हणाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या नेत्यांवरील आरोपांची ग्राफिक्स ट्विटरवर ट्विट केली आहेत. यावर फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

फडणवीस म्हणाले कि, ज्या पक्षाचे दोन नेते भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली जेलमध्ये असतील आणि अनेक नेत्यांवर त्या ठिकाणी खटले सुरू असतील अशा पक्षाने यादी टाकण्याचा नैतिक अधिकार आहे का? त्यांनी अगोदर आरसा पाहावा आणि नंतर अशा प्रकारचे ट्वीट करावे, असा टोला लगावला. तसेच संजय राठोड यांना देण्यात आलेल्या मंत्रिपदावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण दिले आहे, असेही फडणवीस म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!