Share

Uddhav Thackeray | उद्धव ठाकरे अजूनही विधान परिषदेवर! आमदारकीचा राजीनामा दिलाच नाही, काय आहे कारण ?

Published On: 

मुंबई : महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ होत असतानाच एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. घोषणेनंतरही महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिकृतपणे आमदार पदाचा राजीनामा दिलेला नाही, असे सांगण्यात आले आहे. पीटीआयने विधान भवनातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. अशी घोषणा उद्धव यांनी फार पूर्वीच केली होती.

शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा अधिकृत राजीनामा दिलेला नाही. मुख्यमंत्रीपदावरून पायउतार होताना त्यांनी यासंदर्भातील घोषणा करून 39 दिवस उलटले आहेत. महाराष्ट्र विधान भवनाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सोमवारी सांगितले की, तांत्रिकदृष्ट्या उद्धव ठाकरे अद्यापही विधान परिषदेचे सदस्य आहेत कारण त्यांनी अद्याप राजीनामा सादर केलेला नाही.

अधिकृतपणे विधानपरिषदेचा राजीनामा दिलेला नाही-

अधिकाऱ्याने सांगितले की, त्यांनी अद्याप अधिकृतपणे विधानपरिषदेचा राजीनामा दिलेला नाही. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी स्वीकारला आहे, परंतु राज्य विधिमंडळाच्या वरिष्ठ सभागृहातून राजीनामा देण्याबाबत आम्हाला त्यांच्याकडून कोणताही लेखी संदेश प्राप्त झालेला नाही.

39 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर महाराष्ट्रातील मंत्रिमंडळाचा विस्तार-

दरम्यान, 39 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला आहे. भाजपच्या कोट्यातून 9 मंत्र्यांनी शपथ घेतली आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटातून 9 आमदारांनी शपथ घेतली आहे. भगतसिंग कोश्यारी यांनी एकूण 18 आमदारांना मंत्रिपदाची शपथ दिली.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!