🕒 1 min read
मुंबई : राष्ट्रकुल २०२२ स्पर्धेच्या १०व्या सामन्यात भारताने बार्बाडोस संघाचा १०० धावांनी पराभव केला. या विजयासह भारताने सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. या टी-२० सामन्यात प्रथम खेळताना भारताने जेमिमा रॉड्रिग्सच्या अर्धशतकाच्या सहाय्याने १६२ धावा केल्या. प्रत्युत्तरात बार्बाडोस संघ केवळ ६२ धावांवर ८ गडी बाद अशा स्थितीत गारद झाला. भारताकडून गोलंदाजी करताना रेणुका सिंगने अवघ्या १० धावांत ४ बळी घेतले.
सामन्याच्या सुरुवातीला नाणेफेक गमावल्यानंतर भारतीय संघाला पहिल्यांदा फलंदाजी करावी लागली. भारताला पहिला धक्का लवकर बसला आणि स्मृती मानधना अवघ्या ५ धावा करून बाद झाली. त्यानंतर जेमिमा रॉड्रिग्सने शफाली वर्मा (२६ चेंडूत ४३) सोबत दुसऱ्या विकेटसाठी ७१ धावा जोडल्या. यानंतर १६ धावांच्या आत भारताला ३ झटके बसले आणि भारताची धावसंख्या ७६/१ वरून ९२/४ अशी स्थिती झाली. त्यानंतर रॉड्रिग्सने दीप्ती शर्मा (२८ चेंडू ३४*) सोबत पाचव्या विकेटसाठी ७० धावा जोडून संघाला १६० च्या पुढे नेले. जेमिमा रॉड्रिग्जने ४६ चेंडूत नाबाद ५६ धावा केल्या.
A fantastic victory for #TeamIndia.
They win by 100 runs and advance into the semi-finals at the #CWG2022 ????????
Scorecard – https://t.co/upMpWogmIP #INDvBAR #B2022 pic.twitter.com/uH6u7psVmG
— BCCI Women (@BCCIWomen) August 3, 2022
लक्ष्याचा पाठलाग करताना रेणुका सिंगच्या दमदार गोलंदाजीसमोर बार्बाडोस संघ गडगडला. संघाने १९ धावांतच ४ गडी गमावले. बार्बाडोससाठी फक्त कॅशोना नाइट (१६) आणि शकीरा सेलमन (१२*) यांनाच १० पेक्षा जास्त धावा करता आल्या. ब गटात पहिल्या स्थानासाठी इंग्लंडचा सामना ४ ऑगस्टला न्यूझीलंडशी होईल, तर दक्षिण आफ्रिकेचा सामना श्रीलंकेशी होणार आहे. इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्यातील विजयी संघ उपांत्य फेरीत भारताचा सामना करेल. या सामन्यात पराभूत संघाचा सामना ऑस्ट्रेलियाशी होईल.
महत्वाच्या बातम्या :
- Eknath Shinde Vs Uddhav Thackeray | शिवसेना कुणाची? महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज ‘सर्वोच्च’ सुनावणी!
- IND vs SA : भारतीय संघ पुन्हा एकदा दक्षिण आफ्रिकेशी भिडणार, ‘असे’ आहे सामन्यांचे वेळापत्रक!
- Chandrakant Khaire | उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात बोलणाऱ्यांना शिवसैनिक सोडणार नाहीत – चंद्रकांत खैरे
- Sushma Andhare | “मुख्यमंत्र्यांचा निष्ठावंत होण्यासाठी शिंदे गटात रस्सीखेच”; सुषमा अंधारे यांची टीका
- Ramdas Kadam | “अंगावर आले तर शिंगावर घेऊ” ; उदय सामंत हल्ला प्रकरणावर रामदास कदम आक्रमक!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
