Share

Ramdas Kadam | “अंगावर आले तर शिंगावर घेऊ” ; उदय सामंत हल्ला प्रकरणावर रामदास कदम आक्रमक!

Published On: 

मुंबई : बंडखोर आमदारांबाबत शिवसेनेने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी सुरु आहे. त्यामुळे याबाबत कोणी प्रतिक्रिया देत नसले तरी रामदास कदम यांनी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांच्यावर मात्र खोचक टिका केली आहे. तर दुसरीकडे आपण आदित्य अन् उद्धव ठाकरे यांच्याबद्दल काही बोलणार नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रकरण सुरु असून एकमेकांवर टिका करुन अधिकचा असंतोष निर्माण करण्यापेक्षा त्याबाबत प्रतिक्रिया देणेच टाळले जात आहे.

असे असले तरी विधीमंडळात असलेल्या बहुमताचा विचार झाला तर शिंदे गटाकडे 51 आणि दुसऱ्या बाजूला 15 आमदार असल्याचेही कदमांनी स्पष्ट केले आहे. त्यांच्या प्रतिक्रिये नंतर शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी देसाईंवर निशाणा साधला आहे. प्रत्येक बैठकीत झोपा काढणारा माणूस आज बोलायला लागला देसाई यांनी तोंड उघडले याचे मला आश्चर्य वाटते. देसाई कॅबिनेमध्ये झोपा काढणार माणूस अशी खरमरीत टीका रामदास कदमांनी केली आहे. उदय सामंत आणि एकनाथ शिंदे यांनी आशा भ्याड हल्ल्याकडे लक्ष देऊ नये. आपल्या मतदार संघात आणि महाराष्ट्राच्या विकासाकडे लक्ष द्यावे असा सल्लाही रामदास कदम यांनी दिला आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!