औरंगाबाद : पुण्यातील कात्रज येथे एकनाथ शिंदे गट विरुद्ध उद्धव ठाकरे गटामध्ये मोठा गदारोळ निर्माण झाला. पुण्यात या दोन्ही गटातील वाद शिगेला पोहचला. बंडखोर नेते उदय सामंत यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी कात्रज येथे हल्ला करण्याचा प्रयत्न केला,” शिवसेनेशी गद्दारी करायची, पुन्हा आमच्या नेत्यांविरुद्ध काहीही बोलायचं हे आता आम्ही सहन करणार नाही. उठसूठ उद्धव साहेब, आदित्य ठाकरे यांच्यावर टीका कशासाठी करता. आता गेलात ना तिकडे, केली ना गद्दारी मग शांत बसा, शिंदेंची तळी उचला”,अशा शब्दात शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी उदय सामंत यांच्यावर काल झालेल्या हल्ल्यावर प्रतिक्रिया दिली.
चंद्रकांत खैरे म्हणाले, हल्याचे समर्थन करणार नाही, पण हे हल्ले का होतात ? याचा देखील त्यांनी विचार केला पाहिजे. कोणीही उठतो उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करतो. तो तानाजी सावंत म्हणतो मी आदित्यला ओळखत नाही, रात्रंदिवस त्यांच्या मागे फिरत होता, आता ओळखत नाही. पण ही गुर्मी पैशाची मस्ती जास्त दिवस चालत नाही, तुमच्याही मागे कधीतरी ईडी लागेल, असा इशाराही खैरे यांनी यावेळी दिला.
महत्वाच्या बातम्या :
- Sushma Andhare | “मुख्यमंत्र्यांचा निष्ठावंत होण्यासाठी शिंदे गटात रस्सीखेच”; सुषमा अंधारे यांची टीका
- Ramdas Kadam | “अंगावर आले तर शिंगावर घेऊ” ; उदय सामंत हल्ला प्रकरणावर रामदास कदम आक्रमक!
- Uddhav Thackeray | “निष्ठेचं दूध पाजलं पण औलाद गद्दारच राहिली”; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
- Arvind Sawant | सातत्याने वाईट भाषेत बोलणारे भोंगे भाजपला मान्य आहेत का? – अरविंद सावंत
- Ganesh Chaturthi 2022 | आता रात्री १२ वाजेपर्यंत लाऊडस्पीकरला परवानगी, गणपती उत्सवाबाबत शिंदे सरकारचे मोठे निर्णय
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

