🕒 1 min read
मुंबई : भारतीय क्रिकेट संघाच्या पुढील ३ मालिकांचे वेळापत्रक बीसीसीआयने बुधवारी जाहीर केले आहे. भारतीय संघाला आधी ऑस्ट्रेलिया आणि नंतर दक्षिण आफ्रिकेविरुध्द घरच्या मैदानावर सामने खेळायचे आहेत. आगामी काळात ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आयसीसी टी-२० विश्वचषकापूर्वी भारताला या मालिकांचा फायदा होणार आहे. त्यामुळे भारतीय संघ ऑस्ट्रेलिया आणि त्यानंतर दक्षिण आफ्रिकेसोबत घरच्या मैदानावर सामने खेळणार आहे.
बीसीसीआयने बुधवारी ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकांची अधिकृत घोषणा केली आहे. भारतीय संघ घरच्या मैदानावर २२ दिवसांत या दोन संघांविरुद्ध एकूण ९ सामने खेळणार आहे. टी-२० विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेचे संघ भारत दौऱ्यावर येणार आहेत. ऑस्ट्रेलिया संघ भारतात सप्टेंबरमध्ये ३ सामन्यांची टी-२० मालिका खेळणार आहे. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा संघ ३ टी-२० आणि ३ एकदिवसीय सामने खेळण्यासाठी भारतात येणार आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-२० मालिका
ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यामध्ये तीन सामन्यांच्या टी-२० मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. मालिकेतील पहिला सामना २० सप्टेंबर रोजी मोहालीत खेळवला जाणार आहे. दुसरा सामना २३ सप्टेंबरला नागपुरात तर शेवटचा टी-२० सामना २५ सप्टेंबरला हैदराबादमध्ये होणार आहे.
Take a look at #TeamIndia's home series fixture against Australia. ????#INDvAUS pic.twitter.com/zwNuDtF32R
— BCCI (@BCCI) August 3, 2022
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-२० आणि एकदिवसीय मालिका
ऑस्ट्रेलियानंतर लगेचच दक्षिण आफ्रिकेचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. या दोन्ही संघात सुरुवातीला टी-२० मालिका खेळवली जाईल. २८ सप्टेंबर रोजी तिरुअनंतपुरम येथे पहिल्या टी-२० सामना खेळला जाणार आहे. दुसरा सामना २ ऑक्टोबरला गुवाहाटीमध्ये तर तिसरा सामना ४ ऑक्टोबरला इंदोरमध्ये खेळवला जाईल. यानंतर दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांची एकदिवसीय मालिकाही खेळली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना ६ ऑक्टोबरला लखनऊमध्ये खेळवला जाणार आहे. दुसरा एकदिवसीय सामना ९ ऑक्टोबर रोजी रांची येथे तर शेवटचा सामना ११ ऑक्टोबर रोजी दिल्लीत होणार आहे.
Check out the #INDvSA home series schedule. ????#TeamIndia | @BCCI | @OfficialCSA pic.twitter.com/jo8zC4hjDq
— BCCI (@BCCI) August 3, 2022
महत्वाच्या बातम्या :
- Chandrakant Khaire | उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात बोलणाऱ्यांना शिवसैनिक सोडणार नाहीत – चंद्रकांत खैरे
- Sushma Andhare | “मुख्यमंत्र्यांचा निष्ठावंत होण्यासाठी शिंदे गटात रस्सीखेच”; सुषमा अंधारे यांची टीका
- Ramdas Kadam | “अंगावर आले तर शिंगावर घेऊ” ; उदय सामंत हल्ला प्रकरणावर रामदास कदम आक्रमक!
- Uddhav Thackeray | “निष्ठेचं दूध पाजलं पण औलाद गद्दारच राहिली”; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
- Arvind Sawant | सातत्याने वाईट भाषेत बोलणारे भोंगे भाजपला मान्य आहेत का? – अरविंद सावंत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
