🕒 1 min read
Draupadi Murmu । मुंबई : १८ तारखेला देशांतील सर्वोच्च अशा राष्ट्रपती पदासाठी देशात निवडणूक पार पडली. एनडीएकडून द्रोपदी मुर्मू तर यूपीएकडून यशवंत सिन्हा यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळाली. देशभरातील आमदार-खासदारांचे संख्याबळ लक्षात घेतले तर द्रौपदी मुर्मू यांचे पारडे जड असल्याचे चित्र आधीपासूनच दिसत होते. देशाच्या १५ व्या राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू सहज निवडून येतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती. मात्र आता हि चर्चा खरी ठरली आहे. आदिवासी समाजाच्या महिला द्रौपदी मुर्मू याच भारताच्या पंधराव्या राष्ट्रपती ठरल्या आहेत.
द्रोपदी मुर्मू यांनी यशवंत सिन्हा यांच्यावरती सहज विजय प्राप्त केला आहे. आत्ताच राष्ट्रपती निवडणुकीचा निकाल हाती आला आहे. सकाळपासून या निवडणुकीसाठी मतमोजणी सुरू होती. त्याचा आता निकाल लागलेला आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत मुर्मू यांच्या विजयाचा जल्लोष केला आहे. मतमोजणी दरम्यान मुर्मू आघाडीवर असल्याने त्यांचा विजय निश्तित मानला जात होता. द्रौपदी मुर्मू यांना 1,333 मतं मिळाली आहेत. तर विरोधी पक्षाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांना 812 मतं मिळाली आहेत.
दरम्यान, भाजपने द्रौपदी मुर्मू यांची उमेदवारी जाहीर केल्यापासूनच त्यांची चर्चा देशभर सुरू होती. मुर्मू यांच्यासाठी भाजपने देशभरात जोर लावला होता. त्यासाठी त्यांनी अनेक पक्षांना मतदानासाठी आवाहन केलं होतं. विरोधी पक्षातील काही पक्षांनीही त्यांना या निवडणुकीत मतदान केलं आहे. त्यामुळे त्यांना या निवडणुकीत मोठी मदत झाली आहे. तसेच द्रौपदी मुर्मू विजयानंतर आता 25 जुलैला राष्ट्रपतीपदाची शपथ घेतील. त्याआधी म्हणजेच 24 जुलै सध्याचे विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ संपणार आहे.
महत्वाच्या बातम्या :
- ODI Cricket : वनडे क्रिकेटला हटवण्याबाबत वसीम अक्रमचं धक्कादायक वक्तव्य, म्हणाला…!
- Praful Patel : राष्ट्रवादीला मोठा धक्का ! ईडीकडून प्रफुल पटेल यांची संपत्ती जप्त
- Sidhu Moosewala | “अब तेरा नंबर है बापू”; सिद्धू मूसेवालाच्या वडिलांना मिळाली धमकी
- OBC reservation | ओबीसी आरक्षणावर राज ठाकरे यांची प्रतिक्रिया, म्हणाले..
- Rupali Patil | “तुम्ही उद्या ब्लू फिल्म टाकून…” ; रुपाली पाटलांचा चित्रा वाघ यांच्यावर घणाघात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
