Share

Praful Patel : राष्ट्रवादीला मोठा धक्का ! ईडीकडून प्रफुल पटेल यांची संपत्ती जप्त

Published On: 

Praful Patel । मुंबई : नॅशनल हेराल्ड प्रकरणात ईडीने काँग्रेस पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना समन्स बजावलेले आहे. आज सोनिया गांधी या चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर झाल्या होत्या. याविरोधात काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली असून आज देशभरात आंदोलने केली गेली. त्यामुळे आज दिवसभर देशातील राजकीय वातावरण तापलेलं होत. असं असतानाच दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल पटेल यांच्याविरोधात ईडीने खूप मोठी कारवाई केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेससाठी हा खूप मोठा झटका आहे. प्रफुल्ल पटेल यांची ईडीकडून याआधी दोनवेळा चौकशी झाली आहे. त्यानंतर ईडीने ही कारवाई केली आहे. दोनवेळा केलेल्या चौकशीनंतर ईडीने जो तपास केला त्यानंतर पटेल यांच्याविरोधात मोठी कारवाई करण्यात आली. मुंबईतील त्यांच्या सीजे हाऊसमधील घरावर टाच आणण्यात आली आहे. इक्बाल मिर्चीप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. काही संपत्तीवर आधीच टाच आणली होती. आता पुन्हा एकदा ईडीने पटेल यांच्यावर कारवाई केली आहे.

सीजे हाऊस ही बिल्डिंग वरळीत, अॅट्रिया मॉलच्या समोरच्या परिसरात आहे. याच ठिकाणी ईडीने कारवाई केली आहे. वरळी येथील प्लॉट खेरदी प्रकरणी मनी लाँडरिंग झाल्याचा आरोप हा प्रफुल्ल पटेल यांच्यावर ठेवण्यात आला होता. दरम्यान ईडीने केलेल्या या कारवाईत पटेल यांच्या वरळी येथील घर जप्त करण्यात आले आहे. इक्बाल मिर्ची प्रकरणात मागील काही दिवसांपासून चौकशी करण्यात आली आहे.

दरम्यान, विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे अतिशय जवळचे, निकटवर्तीय म्हणून प्रफुल्ल पटेल यांची ओळख आहे. सध्या ते राष्ट्रवादीकडून राज्यसभेचे खासदार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमधील पहिल्या फळीतील नेते म्हणून त्यांची ओळख आहे. आजवर ४ वेळा लोकसभेवर निवडून गेलेले आहेत. तसेच त्यांनी काँग्रेसच्या काळात केंद्रीय मंत्रिमंडळातमध्ये त्यांनी अनेक पदे भुषवली आहेत.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!