🕒 1 min read
मुंबई : पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी वेगवान गोलंदाज वसीम अक्रम याने वनडे क्रिकेटबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. त्याने आयसीसी आणि इतर क्रिकेट संघटनांकडून एकदिवसीय क्रिकेट काढून टाकण्याची मागणी केली आहे. इंग्लंडला एकदिवसीय मालिकेत टीम इंडियाकडून २-१ असा पराभव पत्करावा लागला होता. यानंतर इंग्लंडचा स्टार अष्टपैलू बेन स्टोक्सने क्रिकेटच्या या फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली होती. अशातच दक्षिण आफ्रिकेच्या संघानेही ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर वनडे मालिका खेळण्यास नकार दिला आहे. त्यानंतर मात्र ५०-५० षटकांच्या क्रिकेटच्या भवितव्यावर प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले आहेत. दरम्यान, क्रिकेट कॅलेंडरमधून एकदिवसीय सामने काढून टाकले पाहिजेत तसेच ते रद्द केले पाहिजे. असे मत पाकिस्तानच्या वसीम अक्रम याने व्यक्त केले आहे.
आपल्या मुद्द्यावर तर्क करताना वसीम अक्रम म्हणाला की, सध्या एकदिवसीय क्रिकेटला खेचलं जात आहे. टी-२० क्रिकेट खेळणे सोपे आहे. पण एकदिवसीय क्रिकेट खेळाडूंना थकवणारे आहे. अक्रम द टेलीग्राफ वन अँड टफर्स क्रिकेट क्लब पॉडकास्टवर म्हणाला की, ‘टी-२० क्रिकेट खूप सोपे आहे आणि ते चार तासांत संपते. माझ्या मते जगभरातील लीग भरपूर पैसे कमावतात आणि हा आधुनिक क्रिकेटचा भाग आहे. आता टी-२० असो किंवा कसोटी क्रिकेट यांच्या तुलनेत एकदिवसीय क्रिकेट हे कंटाळवाणे झाले आहे.
वसीम अक्रम पुढे म्हणाला की, ‘क्रिकेटरसाठी एकदिवसीय क्रिकेट खेळणे खूप थकवणारे झाले आहे. कोणत्याही खेळाडूला टी-२० नंतर एकदिवसीय क्रिकेट खेळणे कठीण वाटते. यामुळे आता खेळाडू टी-२० आणि कसोटी क्रिकेटवर अधिक लक्ष केंद्रित करत आहेत. आता एकदिवसीय क्रिकेटमध्येही स्टेडियम भरलेले नसतात. स्टोक्सची एकदिवसीय क्रिकेटमधून अचानक झालेली निवृत्ती दुःखद आहे, पण मी त्याच्या निर्णयाशी सहमत आहे. एक समालोचक म्हणूनही माझा असा विश्वास आहे की एकदिवसीय क्रिकेट हे टी-२० नंतर फक्त एक ताण आहे. एक खेळाडू म्हणून मी ते अनुभवू शकतो. एकदिवसीय सामन्यांमध्ये खेळाडुंना गरजेपेक्षा जास्त मेहनत घ्यावी लागते. अक्रमने कसोटी हे त्याचे सर्वात आवडते स्वरूप असल्याचे म्हटले आहे.
Wasim Akram said, "ODI format should be scrapped permanently, it's just a drag on". (To Telegraph).
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) July 21, 2022
महत्वाच्या बातम्या :
- OBC reservation | ओबीसी आरक्षणावर राज ठाकरे यांची प्रतिक्रिया, म्हणाले..
- Rupali Patil | “तुम्ही उद्या ब्लू फिल्म टाकून…” ; रुपाली पाटलांचा चित्रा वाघ यांच्यावर घणाघात
- IND vs WI : अर्शदीप सिंगला वनडे क्रिकेमध्ये पदार्पणाची संधी; पहिल्या सामन्यासाठी ‘अशी’ असेल भारताची रणनीती
- Sudhir Mungantiwar : सोनिया गांधी संविधानापेक्षा मोठ्या आहेत का? काँग्रेसच्या आंदोलनावरून सुधीर मुनगंटीवारांचा सवाल
- Gautam Adani | गौतम अदानी यांनी बिल गेट्सला टाकले मागे; संपत्तीत झाली ‘एवढ्या’ अब्ज डॉलरची वाढ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
