🕒 1 min read
पुणे : भाजप प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी एक व्हिडीओ ट्विट करून नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप केला. त्या व्हिडिओमध्ये दिसत असलेली व्यक्ती ही नाना पटोले असल्याचा दावा चित्रा वाघ यांनी केला आहे. त्यासोबत ट्विटरवर नाना पटोले यांनी टॅग करत ‘नाना तुम्ही पण झाडी, डोंगर, हॉटेल मध्ये’, असा खोचक प्रश्न उपस्थित केला आहे. चित्रा वाघ यांच्या ट्विट विरोधात महिला नेत्यांनी टीकेच रान उठवलं आहे. तुम्ही ब्लू फिल्म सोशल मीडियावर टाकाल आणि याच उत्तर मागाल, अस कुठे करतात का चित्रा ताई? असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी केला आहे.
“मुळात तुम्हाला नाना पटोले यांच्या खासगी आयुष्यातील व्हिडीओ ट्विट करण्याचे प्रयोजन काय? तो तथाकथित व्हिडीओ खरा आहे खोटा आहे त्याची पडताळणी केली का?, त्या महिलेने तुम्हाला कोणतीही तक्रार केली का? तिला कोणताही त्रास झाला असता आणि त्या महिलेने तुम्हाला तक्रार केली असती तर गोष्ट वेगळी होती. मात्र तुम्हाला विरोधी पक्षनेत्याच्या खासगी आयुष्यात सातत्याने ताकझाक करण्याशिवाय दुसरं काम राहिलेलं नाही आहे,” असे खडे बोल रुपाली पाटील यांनी चित्रा वाघ यांना सुनावले आहेत.
या प्रकरणानंतर चित्रा वाघ यांना देखील ट्रोल केले जात आहे. भाजपमध्ये श्रीकांत देशमुख, शिवसेनेतील बंडखोर खासदार राहुल शेवाळे यांच्याबाबत देखील असेच व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. मात्र चित्रा वाघ यांनी याबाबत ट्वीट किंवा पत्रकार परिषद का घेतली नाही, असा प्रश्न नेटकरी विचारत आहे. चित्रा वाघ यांना नाना पटोलेंचा व्हिडीओ ट्वीट केल्यानंतर अडचणींचा सामना करावा लागत आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या, “राज्यभर नाना पटोले यांचा व्हिडीओ व्हायरल होत होता. मात्र मी ज्यांचा व्हिडीओ आहे त्यांना थेट प्रश्न केला. हे काँग्रेसचं कल्चर नाही असं सांगितलं जातंय, मात्र मला घाण भाषेत बोललं जात आहे, मेसेज केले जात आहेत. मी प्रश्न विचारला ती माझी चुकी आहे का?”
नाना पटोले कायदेशीर करतील कारवाई –
नाना पटोले यांनी भाजपवर चारित्र्य हत्येचा आरोप केला असून, या व्हिडिओची चौकशी करून चित्रा वाघ यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याचे आदेश त्यांच्या कायदेशीर टीमला दिले आहेत. यावर भाजप नेत्या चित्रा वाघ म्हणतात की, ‘मी कोणाच्याही वैयक्तिक आयुष्यात डोकावत नाही. हा व्हिडिओ आधीच व्हायरल झाला आहे. आम्ही देखील कायदेशीर लढाई लढायला तयार आहोत.
महत्वाच्या बातम्या :
- Gautam Adani | गौतम अदानी यांनी बिल गेट्सला टाकले मागे; संपत्तीत झाली ‘एवढ्या’ अब्ज डॉलरची वाढ
- Pune Cyber Crime | भाजपच्या चार महिला आमदारांची आर्थिक फसवणूक; आरोपी ताब्यात
- Vijay Wadettiwar : श्रेयवादापेक्षा OBC आरक्षण मिळाले याचा आम्हाला आनंद – विजय वडेट्टीवार
- Devendra Fadnavis : “सगळा अभ्यास आदित्य ठाकरेंनीच केलाय असे नाही”; मेट्रो कारशेड प्रकरणावरून फडणवीसांचा टोला
- Ganeshotsav 2022 | गणेश मूर्तीच्या उंचीवरील बंधने शिंदे सरकारने उठवली
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
