🕒 1 min read
पुणे : भाजपच्या (भाजप) चार महिला आमदारांची आर्थिक फसवणूक झाल्याची बाब काही दिवसांपूर्वी समोर आली होती ही घटना पुण्यात घडली होती. हाय प्रोफाइल केस असल्याने पुणे पोलिसांनी कमालीची तत्परता दाखवत अवघ्या काही दिवसांतच आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. (पुणे पोलीस)
या प्रकरणी पुण्यात सायबर पोलीसमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तो बिबेवाडी पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला होता. आज आरोपीला औरंगबाद येथून अटक करण्यात आली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील मुकेश राठोड आणि औरंगाबाद जिल्ह्यातील सुनीता क्षीरसागर यांना पुणे पोलिसांनी औरंगाबाद येथून ताब्यात घेतलं आहे. सुनीता आणि मुकेश हे दोघेही शेतकरी कुटुंबातील असून खर्चासाठी पैसे लागत असल्याने या दोघांनी मिळून चार आमदारांना खोटं सांगून पैसे घेतले.
माझी आई बाणेर येथे हॉस्पिटलमध्ये आहे मला काही पैसांची गरज आहे तुम्ही मला 3400 रुपय ऑनलाइन पाठव अशी बतावणी करून भाजप आमदार माधुरी मिसाळ यांच्याकडून पैसे मागून घेतले. मात्र हीच घटना आपल्या सहकारी महिला आमदार श्वेता महाले, मेघना बोर्डीकर ,आणि देवयानी फरांदे यांचा सोबत देखील घडल्याचे समोर आल्यानंतर आमदार माधुरी मिसाळ यांनी तक्रार दाखल केली होती.
या दोघांनी अजून कोणाची फसवणूक केली आहे का, याचा तपास बिबवेवाडी पोलीस करत असून दोन्ही आरोपींना कोर्टामध्ये आज हजर केले जाणार आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Ganeshotsav 2022 | गणेश मूर्तीच्या उंचीवरील बंधने शिंदे सरकारने उठवली
- Eknath shinde : गणेशोत्सव, दहीहंडी निर्बंधमुक्त होणार; शिंदे सरकारचा निर्णय
- Urfi Javed | प्रत्येक मुलीला कुणीतरी म्हणतच की माझ्यासोबत झोपावं लागेल- उर्फी जावेद
- Rajni Patil : असंवैधानिक पद्धतीने घटनेची पायमल्ली केली जात आहे – रजनी पाटील
- Aditya Thackeray : “शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार म्हणजे कोसळणारच, हे लिहून घ्या”; आदित्य ठाकरेंनी केली मोठी भविष्यवाणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
