🕒 1 min read
महाराष्ट्र देशा डेस्क : सध्या करण जोहर याचा रिअॅलिटी शो ‘कॉफी विथ करण’ जोरात सुरू आहे. या टॉक शोचे दोन भाग प्रदर्शित झाले आहेत. पहिल्या एपिसोडमध्ये बॉलीवूड स्टार आलिया भट्ट आणि रणवीर सिंग हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, तर दुसऱ्या एपिसोडमध्ये सारा अली खान आणि जानव्ही कपूर या अभिनेत्री उपस्थित होत्या. आतापर्यंत प्रेक्षकांनी या दोन्ही भागांना भरभरून प्रेम दिले आहे. पण तुम्हाला माहीत आहे का या टॉक शोचा होस्ट म्हणजेच करण जोहर एका एपिसोडसाठी किती मानधन आकारतो? त्याचे या शोचे मानधन ऐकून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल.
कारण जोहर हा बॉलीवूडचा आघाडीचा दिग्दर्शक आणि निर्माता आहे. करण जोहरचा हा शो म्हणजेच ‘कॉफी विथ करण’ हा सर्वात जास्त पाहिला जाणारा शो आहे आणि करण जोहर या शोसाठी बक्कळ फी देखील घेतो. एका खासगी वेबसाइटच्या रिपोर्टनुसार, करण या सीझनच्या एका एपिसोडसाठी 2 ते 3 कोटी रुपये फी आकारतो. या शोच्या सातव्या सीझनमध्ये 20-22 एपिसोड्स असतील, त्यानुसार करणने या संपूर्ण सीझनसाठी 40 ते 44 कोटी रुपये घेतले आहेत. हे मानधन एखाद्या सुपरस्टार अभिनेत्याला मिळणाऱ्या मानधनाएवढे आहे.
रणवीर सिंग आणि आलिया भट्टसोबत ‘कॉफी विथ करण’च्या या सिझनची धमाकेदार सुरुवात झाली. त्यांनतर सारा अली खान आणि जान्हवी कपूर देखील दिसल्या. या शो दरम्यान, साराने सांगितले की तिला दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेते विजय देवरकोंडा याच्यावर क्रश आहे आणि विजयला देखील याबद्दल माहिती आहे. कारण त्याने स्वतः त्याच्या इंस्टाग्रामवर शोचा ट्रेलर शेअर केला आहे ज्यामध्ये साराने सांगितले की तिला त्याला डेट करायचे आहे. याचबरोबर या चौघांनीही त्यांच्या आयुष्यातील अनेक गुपिते या शोमध्ये उघड केली आहेत.
महत्वाच्या बातम्या :
- Eknath Shinde : एकनाथ शिंदेंची मुख्य नेतेपदी निवड, तर दीपक केसरकर प्रवक्ते; नवीन कार्यकारणी जाहीर
- Tejashwi Yadav : तेजस्वी यादवचं क्रिकेट प्रेम! पंतप्रधान मोदींनी दिला होता वजन कमी करण्याचा सल्ला; पाहा VIDEO!
- Urfi Javed | पहा उर्फी जावेद हिची ‘रिस्की फॅशन’; फ्रंट ओपन टॉप पाहून चाहते शॉक
- Shivsena : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, शिंदे गट करणार स्वत: ची कार्यकारणी; ऑनलाईन बैठकीला 14 खासदारांची उपस्थिती
- IND vs ENG : बुमराहच्या गैरहजेरीत गोलंदाजीच्या जबाबदारी बाबत हार्दिक पंड्याचा मोठा खुलासा; वाचा!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
