🕒 1 min read
Shivsena। मुंबई : राज्याच्या राजकारणात रोज मोठ्या घटना घडत आहेत. राज्यातील सत्ता गमावल्यांनंतर दिवसेंदिवस सेनेला धक्क्यांवर धक्के बसत आहेत. आज पुन्हा शिवसेनेला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. माजी विरोधी पक्षनेते आणि मंत्री रामदास कदम यांनी शिवसेना नेतेपदाचा राजीनामा दिला आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे गट आता स्वत: ची कार्यकारणी तयार करणार असल्याची माहिती समोर येत आहे.
यामध्ये म्हणजे शिंदे गटातील आमदारांच्या बैठकीत शिवसेनेच्या 14 खासदारांनी ऑनलाइन उपस्थिती दर्शवली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे गटाकडून शिवसेनेवर दावा करण्याची तयारी सुरू असल्याची चर्चा सुरू झाली आहे. तसेच आणखी दोन खासदारही शिवसेनेच्या संपर्कात असल्याचे सांगण्यात येत आहेत. अलीकडे राज्यातील अनेक महापालिका, नगरपालिकांत शिवसेनेत फूट पडून अनेक माजी नगरसेवक आणि शिवसेनेचे पदाधिकारी हे शिंदे गटाला पाठिंबा देत आहेत.
शिवसेनेच्या 19 पैकी 14 खासदारांनी ऑनलाइन उपस्थिती दर्शवल्यामुळे उद्धव ठाकरे यांना आणखी एक मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीत जाणार आहेत. त्यामुळे खरी शिवसेना आमचीच असल्याचा दावा मजबूत करण्यासाठी एकनाथ शिंदे गट अधिक आक्रमक झाल्याचे चित्र आहे. त्यासाठी आता खासदारांपासून ते स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी, कार्यकर्ते यांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी शिंदे गट जोरदार प्रयत्न करत आहे.
महत्वाच्या बातम्या :
- IND vs ENG : बुमराहच्या गैरहजेरीत गोलंदाजीच्या जबाबदारी बाबत हार्दिक पंड्याचा मोठा खुलासा; वाचा!
- Priyanka Chopra | प्रियंका चोप्रा झाली ४० वर्षांची; बॉलीवूडमध्ये पूर्ण केली २० वर्ष
- Deepali Sayed | “…त्याबद्दल संजय राऊत साहेबांना कल्पना नसावी” ; दीपाली सय्यद यांचे ट्वीट
- Ramdas kadam : “शिवसेनाप्रमुख असते, तर माझ्यावर ही वेळ आली नसती आणि म्हणून… “; रामदास कदमांच गंभीर विधान
- IND vs ENG : “धोनी आणि रोहित शर्माची नेतृत्वशैली एकसमान”, भारताच्या माजी फिरकीपटूची प्रतिक्रीया
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
