Share

Urfi Javed | पहा उर्फी जावेद हिची ‘रिस्की फॅशन’; फ्रंट ओपन टॉप पाहून चाहते शॉक

Published On: 

🕒 1 min read

महाराष्ट्र देशा डेस्क : नेहमीच अतरंगी कपड्यांमुळे चर्चेत असणारी बिग बॉस स्टार उर्फी जावेद हीच ‘फॅशन सेन्स’ सामान्य माणसाच्या कल्पनेपलीकडचा आहे. ती कधी प्लास्टिकपासून बनवलेल्या ड्रेसमध्ये, तर कधी फुलांच्या, कधी कॉटन कँडीमध्ये तर कधी पोत्याच्या कापडापासून बनवलेल्या ड्रेसमध्ये दिसली एवढं नाही तर तिने चक्क वर्तमानपत्रापासून बनलेला ड्रेसही परिधान केला होता. उर्फी प्रत्येक वेळा तिच्या जुन्या ड्रेसपेक्षा अधिक बोल्ड ड्रेस परिधान करते आणि चाहत्यांना आश्चर्यचकित करते. पण यावेळी उर्फी जावेदने आपल्या कपड्यांबाबतीत एवढी रिस्क घेतली आहे की, ती तिच्यासाठी अडचणीची ठरू शकली असती. उर्फीचा फक्त एका धाग्याने बांधलेला टॉप घालून गेम खेळतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून तिच्या ड्रेसची सर्वत्र चर्चा होत आहे.

या व्हिडिओमध्ये उर्फी जावेदने ऑरेंज कलरचा फ्रंट ओपन टॉप घातला आहे. हा टॉप ब्रा-लेस देखील आहे. विशेष बाब म्हणजे उर्फीचा हा टॉप एखाद्या जाकीटप्रमाणे समोरून पूर्णपणे उघड असून वरच्या बाजूला फक्त एका पातळ धाग्याने बांधला आहे. उर्फीने या अतिशय बोल्ड आणि रिलीव्हिंग टॉपसह लो-वेस्ट जीन्स घातली आहे.

https://www.instagram.com/tv/CgJdfZdF_h_/?utm_source=ig_web_copy_link

या व्हिडिओमध्ये उर्फीने तिचा टॉप इतक्या नाजूक धाग्याने बांधला आहे की तिच्या एका चुकीमुळे ती ‘ऊप्स’ मोमेंटची शिकार होऊ शकते. तसेच या व्हिडिओमध्ये उर्फी जावेद स्नूकर खेळताना दिसत आहे. “हाच पूल खेळण्याचा योग्य मार्ग आहे”, असे कॅप्शन उर्फीने या व्हिडिओला दिले आहे.

ब्लेडचा ड्रेस 

उर्फीने काही दिवसांपूर्वी एक नवीन प्रयोग केला होता. ज्यामध्ये तिने चक्क ब्लेडपासून बनलेला ड्रेस परिधान केला होता. उर्फी जावेदने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडिओ शेयर केला आहे, ज्यामध्ये तिने शेकडो धार-धार ब्लेडपासून बनवलेला ड्रेस परिधान केला आहे. उर्फीचा हा व्हिडिओ पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!