Share

Eknath Shinde : एकनाथ शिंदेंची मुख्य नेतेपदी निवड, तर दीपक केसरकर प्रवक्ते; नवीन कार्यकारणी जाहीर

Published On: 

🕒 1 min read

Shivsena। मुंबई : एकनाथ शिंदे गट आता स्वत: ची कार्यकारणी तयार करणार असल्याची माहिती समोर येत आहे. यामध्ये म्हणजे शिंदे गटातील आमदारांच्या बैठकीत शिवसेनेच्या 14 खासदारांनी ऑनलाइन उपस्थिती दर्शवली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे गटाकडून शिवसेनेवर दावा करण्याची तयारी सुरू असल्याची चर्चा सुरू झाली आहे. तसेच आणखी दोन खासदारही शिवसेनेच्या संपर्कात असल्याचे सांगण्यात येत आहेत.

शिवसेनेच्या 19 पैकी 14 खासदारांनी ऑनलाइन उपस्थिती दर्शवल्यामुळे उद्धव ठाकरे यांना आणखी एक मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे. या बैठकीनंतर एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून शिवसेनेची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांची मुख्य नेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षप्रमुख पदी कुणाचीही नियुक्ती करण्यात आलेली नाही. दीपक केसरकर यांची मुख्य प्रवक्ते नियुक्ती करण्यात आली आहे. 14 खासदार या बैठकीला होते का याबाबत मात्र काहीही थेट बोलणे केसरकर यांनी टाळले. सर्व खासदार आमच्यासोबत असल्याचे त्यांनी सांगितले, अशी माहिती एका एका वृत्तवाहिनीमार्फत समोर आली आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीत जाणार आहेत. त्यामुळे खरी शिवसेना आमचीच असल्याचा दावा मजबूत करण्यासाठी एकनाथ शिंदे गट अधिक आक्रमक झाल्याचे चित्र आहे. त्यासाठी आता खासदारांपासून ते स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी, कार्यकर्ते यांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी शिंदे गट जोरदार प्रयत्न करत आहे.

महत्वाच्या बातम्या :

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!