🕒 1 min read
मुंबई : राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) प्रमुख लालू प्रसाद यादव यांचा मुलगा तेजस्वी यादव हे क्रिकेट खेळताना दिसले. तेजस्वी यादव यांनी याअगोदर काही दिवस क्रिकेट खेळलेले आहे. रविवारी तेजस्वी यादव यांनी वेळ काढून हातात बॅट घेऊन आपले फलंदाजीचे कौशल्य दाखवले. नंतर त्यांनी गोलंदाजीतही हात आजमावला. तेजस्वी यादव यांनी क्रिकेट खेळतानाचा त्याचा व्हिडिओ ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केला आहे. व्हिडिओमध्ये तेजस्वी आपल्या राहत्या घरी कर्मचार्यांसोबत क्रिकेट खेळत असल्याचे दिसत आहे.
अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरजेडी नेते तेजस्वी यादव यांना वजन कमी करण्याचा सल्ला दिला होता. यानंतर तेजस्वी यादव त्याच्या निवासस्थानी क्रिकेट खेळताना दिसले. त्यांनी स्वत: ट्विट करून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ते महेंद्रसिंग धोनीचा हेलिकॉप्टर शॉट खेळताना दिसत आहेत.
ट्विटरवर व्हिडिओ शेअर करत तेजस्वी यादव यांनी लिहिले की, ‘आयुष्य असो किंवा खेळाचे मैदान, नेहमी जिंकण्यासाठी खेळले पाहिजे. तुम्ही जेवढ्या मनाने योजना कराल, तितकी तुम्ही मैदानावर चांगली कामगिरी कराल. खूप दिवसांनी फलंदाजी आणि गोलंदाजीत हात आजमावला. जेव्हा ड्रायव्हर, स्वयंपाकी, सफाई कामगार, माळी, गार्ड आणि काळजीवाहू हे सर्व तुमचे सहकारी मैदानावर असतात आणि तुम्हाला फटकेबाजी करून बाद करण्यास उत्सुक असतात तेव्हा ते अधिक समाधानकारक होते.
वो सत्ता में हो या विपक्ष में, परवाह नहीं!
बिहार के जनजीवन के असल मुद्दों के लिए फ्रंटफुट पर खेलने वाला एक ही खिलाड़ी चर्चित है: pic.twitter.com/1p8QRmkg57
— RJD Employment (@employment_rjd) July 17, 2022
राजकारणात येण्यापूर्वी तेजस्वी यादव हे क्रिकेटर होते. ते आयपीएलचाही भाग राहिलेले आहेत. २००८-०९ मध्ये ते दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाशी संबंधित होते. यादरम्यान त्यांना आयपीएलमध्ये एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. याशिवाय त्यांनी विजय हजारे ट्रॉफीमध्ये झारखंडचे कर्णधारपदही भूषवलेले आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Shivsena : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, शिंदे गट करणार स्वत: ची कार्यकारणी; ऑनलाईन बैठकीला 14 खासदारांची उपस्थिती
- IND vs ENG : बुमराहच्या गैरहजेरीत गोलंदाजीच्या जबाबदारी बाबत हार्दिक पंड्याचा मोठा खुलासा; वाचा!
- Priyanka Chopra | प्रियंका चोप्रा झाली ४० वर्षांची; बॉलीवूडमध्ये पूर्ण केली २० वर्ष
- Deepali Sayed | “…त्याबद्दल संजय राऊत साहेबांना कल्पना नसावी” ; दीपाली सय्यद यांचे ट्वीट
- Ramdas kadam : “शिवसेनाप्रमुख असते, तर माझ्यावर ही वेळ आली नसती आणि म्हणून… “; रामदास कदमांच गंभीर विधान
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
