🕒 1 min read
नवी दिल्ली : देशांतील सर्वोच्च अशा राष्ट्रपती पदासाठी आज निवडणूक पार पडणार आहे. एनडीएकडून द्रौपदी मुर्मू तर यूपीएकडून यशवंत सिन्हा यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. आज दिवसभरात देशात ही निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. महाराष्ट्रातून भाजपा आणि शिंदे गट यासह शिवसेना खासदार यांनी एनडीएच्या उमेदवार द्रोपदी मुर्मू यांना पाठींबा दर्शविला आहे. आज होणा-या या निवडणुकीत खासदार आणि आमदार मतदान करणार आहेत. याच मतदानासाठी माजी पंतप्रधान आणि काँग्रेसचे जेष्ठ नेते मनमोहन सिंग हे देखील उपस्थित होते. मात्र यावेळी मनमोहन सिंग यांना व्हीलचेअरवर बसवून संसदेत आणण्यात आले. हे दृश्य पाहून उपस्थित सर्वच जणांनी हळहळ वक्त केली.
मनमोहन सिंग हे ८९ वर्षांचे असून वृद्धापकाळामुळे त्यांची तब्बेत खालावली आहे. गेल्या वर्षी त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आले होते. काही दिवसांनी प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले. मात्र तेव्हा पासून त्यांच्या हालचालींवर मर्यादा आल्या आहेत. त्याचमुळे आज मतदानासाठी त्यांना व्हीलचेअरवरुन आणण्यात आले होते. काही सहकाऱ्यांच्या मदतीने ते मतदान करण्यासाठी उभे राहिले. यावेळचे त्यांचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. हे फोटो पाहून नेटकरीही भावुक झाले आहेत.
मुर्मू यांचे पारडे जड
देशभरातील आमदार-खासदारांचे संख्याबळ लक्षात घेतले तर द्रौपदी मुर्मू यांचे पारडे जड असल्याचे चित्र आहे. देशाच्या १५ व्या राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू सहज निवडून येतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी द्रौपदी मुर्मू यांना २०० मतं मिळतील, असे आश्वासन दिले आणि काँग्रेस राष्ट्रवादीची मतं फुटणार असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली. यातच या चर्चांना बळ मिळेल, अशीच विधाने आता भाजपा नेत्यांकडून केली जात आहे.
महत्वाच्या बातम्या:
- Sanjay Raut : “सिढिया चढते हुए जो उतरना भूल जाते है…”, संजय राऊतांचे ट्वीट चर्चेत
- Sanjay Raut | राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेण्यापूर्वी राऊत भावूक! म्हणाले, “मला पॉइंटेड केलं जातंय”
- Kishore Patil : शिवसेना संपवायची वेळ आली याचं मुख्य कारण हे संजय राऊत आहेत – किशोर पाटील
- Presidential election | नितीन राऊतांचे मत बाद करण्याची बबनराव लोणीकरांची मागणी
- Rohit Pawar : “…साठी राज्य सरकारने केंद्राला भाग पाडावं”, रोहित पवारांची मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
