मुंबई: आजपासून गरजेच्या अनेक वस्तू महाग होणार आहेत. गेल्या महिन्यात जीएसटी परिषदेच्या बैठकीत अनेक खाद्यपदार्थ व वस्तूंवरील जीएसटी वाढवण्याचा निर्णय घेतला. त्याची अंमलबजावणी आजपासून करण्यात येणार आहे. यामुळे दही, लस्सी, तांदूळ, पीठ, पनीर, मासे यासह अनेक जीवनावश्यक वस्तू महाग होणार आहेत. यावरूनच राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार (Rohit Pawar) यांनी राज्य सरकारकडे केंद्राने हा निर्णय मागे घ्यावा यासाठी भाग पाडावे, अशी मागणी केली आहे.
“केंद्र सरकारने गहू, तांदूळ यांसह इतर तृणधान्ये, सोयाबीन, मटार यावर ५ टक्के तर प्रिंटिंग-ड्रॉइंग, शाई, पेन्सिल, शार्पनर, ड्रॉइंग, मार्किंग उत्पादने, पेपर-कटिंग यावर १८ टक्के GST लागू केला. यामुळं सामान्य माणसासाठी दररोजचं अन्न आणि शिक्षणही महाग होणार असून ते परवडणार नाही. याबाबत केंद्र सरकारने सहानुभूतीपूर्वक विचार करून धान्य व शैक्षणिक उत्पादनांवरील GST मागे घ्यावा. राज्य सरकारनेही केंद्र सरकारकडं तशी मागणी करुन हा निर्णय त्यांना मागे घेण्यास भाग पाडावं, ही विनंती!”, असे ट्वीट रोहित पवार यांनी केले आहे.
केंद्र सरकारने गहू, तांदूळ यांसह इतर तृणधान्ये, सोयाबीन, मटार यावर ५ टक्के तर प्रिंटिंग-ड्रॉइंग, शाई, पेन्सिल, शार्पनर, ड्रॉइंग, मार्किंग उत्पादने, पेपर-कटिंग यावर १८ टक्के #GST लागू केला. यामुळं सामान्य माणसासाठी दररोजचं अन्न आणि शिक्षणही महाग होणार असून ते परवडणार नाही.
— Rohit Pawar (@RRPSpeaks) July 18, 2022
दरम्यान आजपासून शाळेच्या वस्तूही महागणार आहेत. ब्लेड, कात्री, पेन्सिल शार्पनर, नकाशे, चमचे, काटे चमचे, स्किमर, केक सर्व्हिसवर जीएसटी वाढवला आहे. त्यावर १८% दराने जीएसटी वसूल केला जाईल. तसेच एलईडी बल्बवर १८% जीएसटी आकारण्यात येईल. गोदामात माल ठेवणेही आता महागणार आहे. गोदामात ड्रायफ्रूट्स, मसाले, गूळ, कापूस, चहा, कॉफी इत्यादी ठेवणेही महाग होणार आहेत. त्यांच्यावर १२ टक्के दराने जीएसटी आकारला जाईल.
हॉटेल रूम महागणार-
यापूर्वी १ हजार रुपयांपेक्षा MR कमी किमतीच्या हॉटेलच्या खोल्यांवर जीएसटी नव्हता, आता यावर १२ टक्के जीएसटी लावला जाणार आहे. तसेच रुग्णालयाने ५ हजार रुपयांपेक्षा अधिक दराने खोली उपलब्ध करून दिल्यास त्या खोलीवर १५ टक्के दराने जीएसटी द्यावा यापुढे लागणार आहे.
महत्वाच्या बातम्या:
- Nana Patole : “सत्तेसाठी भाजपचा रावणासारखा अहंकार दिसतोय”; नाना पटोलेंची टीका
- Eknath Shinde : “दिवाळीच्या सुट्टीत तुम्ही मला गुवाहाटीला…”, चिमुकलीचे मुख्यमंत्री शिंदेंकडून अजब प्रॅामिस
- Sanjay Raut : एवढा मोठा गट, एवढा मोठा भाजप, एवढं मोठं बहुमत, मग मंत्रिमंडळाचा विस्तार का नाही?; राऊतांचा सवाल
- Sachin Sawant : “भाजपचे हिंदूत्व आणि राष्ट्रवाद जन्मापासून मृत्यूपर्यंत…”, कॉंग्रेसची टीका
- KRK । केआरकेने दिला कोहलीला सल्ला; ‘देशद्रोही 2’ मध्ये काम करण्याची दिली ऑफर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

