Share

Sanjay Raut | राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेण्यापूर्वी राऊत भावूक! म्हणाले, “मला पॉइंटेड केलं जातंय”

Published On: 

नवी दिल्ली : शिवसेना पक्षातून शिंदे गट वेगळा झाल्यानंतर राज्यात उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शिंदे गट, असा सामना सुरु आहे. शिंदे गटातील आमदार शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर टीका करत आहेत. संजय राऊतांनी शिवसेना फोडली, असा आरोप देखील शिंदे गटातील आमदारांनी केला आहे. दरम्यान, आज संजय राऊत यांनी राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. शपथ घेण्यापूर्वी ते भावूक होते. मला पॉइंटेड केले जात आहे, असे राऊत म्हणाले.

आज तुम्ही राज्यसभेत शपथ घेत आहात, असा प्रश्न संजय राऊतांना विचारण्यात आला. यावेळी ते पत्रकार परिषदेत खुर्चीवरुन उठले होते. ते परत आले आणि पत्रकारांशी संवाद साधला. संजय राऊत म्हणाले, “मी चौथ्यांदा शपथ घेतोय. यासाठी बाळासाहेब ठाकरेंचे आशिर्वाद आहेत. मी त्यांच्याबरोबर काम केलंय. संजय राऊत राज्यसभेत पोहोचू नये यासाठी खूप प्रयत्न केले गेले.”

यावर संजय राऊत राज्यसभेत पोहोचू नये यामध्ये स्वकीयांचा हात होता का? असा प्रश्न राऊत यांना विचारण्यात आले. राऊत म्हणाले, “ते त्यांनी स्पष्ट केले आहे. मला निवडणुकीत पाडायचा प्लॅन असल्याचे त्यांनी सांगितले. पण उद्धव ठाकरे यांचा माझ्यावर विश्वास आहे. आदित्य ठाकरे माझ्यापेक्षा लहान आहेत. पण त्यांचही माझ्यावर प्रेम आहे. आता मला पॉइंटेड केलं जातंय करू द्या.”

…मग मंत्रिमंडळाचा विस्तार का नाही?

संजय राऊत म्हणाले, “दोन जणांचं मंत्रिमंडळ 15 दिवसांपासून चाललं आहे. जगामध्ये लोकशाहीची एवढी चेष्टा कधी झाली नव्हती. प्रश्न एवढाच आहे की, एवढा मोठा तुमचा गट, एवढा मोठा भाजप, इतकं मोठं बहुमत. मग मंत्रिमंडळ का इतक्या दिवसात स्थापन झालं नाही? भविष्यातही मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता कमी दिसत आहे.”

दरम्यान, सध्या राज्यात केवळ दोनच व्यक्ती कारभार पाहत आहेत, अशी टीका त्यांनी केली आहे. मंत्रिमंडळ विस्तार हा सर्वस्वी शिंदे-फडणवीस यांचा अधिकार आहे. ते काही विरोधीपक्ष नेत्याचे काम नाही. त्यांच्याकडे पूर्ण बहुमत देखील आहे. अशावेळी राज्याला मंत्रिमंडळापासून वंचित ठेवणे योग्य नाही.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!