Share

Sanjay Raut : “सिढिया चढते हुए जो उतरना भूल जाते है…”, संजय राऊतांचे ट्वीट चर्चेत

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आपल्या वक्तव्यांनी नेहमीच चर्चेत असतात. राज्यसभेवर ते चौथ्यांदा निवडून आले आहेत. आज त्यांनी राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. मात्र आजच त्यांनी केलेलं एक ट्वीट चर्चेत आले आहे. महाराष्ट्रातील सत्तांतर, राष्ट्रपती निवडणूक, शिवसेनेची भूमिका या सर्व पार्श्वभूमीवर हे ट्वीट चर्चेत आले आहे.

नरेंद्र सक्सेना यांच्या “सिढिया चढते हुए जो उतरना भूल जाते है.. वे घर नहीं लौट पाते.”, या पंक्ती संजय राऊत यांनी ट्वीट केल्या आहेत. यातून त्यांनी नेमका कुणावर निशाणा साधला, याबाबत आता चर्चा रंगत आहेत.

एवढा मोठा गट,  एवढं मोठं बहुमत, मग मंत्रिमंडळाचा विस्तार का नाही? 

राज्यात शिंदे सरकार स्थापन होऊन आता १५ दिवस झाले. मात्र अजूनही मंत्रीमंडळ विस्तार झालेला नाही. आता हाच मुद्दा विरोधी पक्षाने उचलून धरला आहे. यावरून आज पुन्हा एकदा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिंदे सरकारवर आणि भाजपवर निशाणा साधला आहे. संजय राऊत म्हणाले कि, दोन जणांचं मंत्रिमंडळ 15 दिवसांपासून चाललंय. जगामध्ये लोकशाहीची एवढी चेष्टा कधी झाली नव्हती. प्रश्न एवढाच आहे की, एवढा मोठा तुमचा गट, एवढा मोठा भाजपा, इतकं मोठं बहुमत. मग मंत्रिमंडळ का इतक्या दिवसात स्थापन झालं नाही?, असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे. भविष्यातही मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता कमी दिसते. अपात्रतेची टांगती तलवार आहे. बेकायदेशीर सरकार आहे, असा दावाही राऊत यांनी केला.

शिवसेना-शिंदे गट संघर्ष; ‘त्या’ याचिकेवर बुधवारी सुनावणी-

शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांच्यातील सत्ता संघर्षाचा वाद थेट सुप्रीम कोर्टात पोहोचला आहे. शिवसेनेशी बंड करत सत्तास्थापन करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि शिंदे गटावर शिवसेनेने अपात्रतेची कारवाई केली होती, याला शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. तसेच अजय चौधरींच्या गटनेतेपदी नियुक्तीला आव्हान देणाऱ्या याचिका शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात केल्या आहेत. यावर ११ जुलैच्या सुनावणीत पुढील सुनावणी होईपर्यंत आमदारांवर कोणतीही कारवाई होऊ नये असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. तसेच सदरील प्रकरण सरन्यायाधीश रमण यांनी खंडपीठ स्थापन करून सुनावणी केली जाईल, असे स्पष्ट केले होते.

दरम्यान बुधवारी (२० जुलै) सरन्यायाधीश रमण, न्या. कृष्णा मुरारी आणि न्या. हिमा कोहली यांच्या खंडपीठापुढे सुनावणी होणार आहे. या सुनावणीत सर्वोच्च न्यायालय शिवसेनेतील बंडखोरी ते राज्यातील सत्तांतर आणि विधानसभेतील बदलांची कायदेशीर वैधता यावर सुनावणी देईल.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!