Share

Presidential election | नितीन राऊतांचे मत बाद करण्याची बबनराव लोणीकरांची मागणी

Published On: 

मुंबई : देशातील सर्वोच्च पदासाठी म्हणजेच राष्ट्रपती पदासाठी आज देशभरात निवडणूक पार पडणार आहे. एनडीएकडून द्रौपदी मुर्मू तर यूपीएकडून यशवंत सिन्हा हे दोन्ही उमेदवार रीगणात आहेत. मुंबईतील विधानभवन येथे सकाळी 10 ते सायंकाळ 5 दरम्यान हे मतदान पार पडणार आहे. आतापर्यंत या मतदान प्रक्रियेत महाराष्ट्रातील 41 आमदारांनी मतदान केले आहे. या आमदारांपैकी 34 आमदार शिंदे गटातील असून सात आमदार हे अपक्ष आहेत. यातच भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी काँग्रेसचे नेते नितीन राऊत यांचे मत बाद करण्याची मागणी केली आहे. मतदानासाठी लोणीकर यांचा नंबर पहिला असतानाही नितीन राऊत यांनी त्यांच्या आधी मतदान केल्याचे लोणीकरांचे म्हणणे आहे.

बबनराव लोणीकर यांनी सांगितले कि, “मतदानासाठी आम्ही एक तास रांगेत उभे होतो. माझे मतदान त्यांच्या आधी असून सुद्धा राऊतांनी आधी मतदान केले. तसेच मतदानावेळी मतदान कक्षात जाऊन बसता येत नाही, असे असताना ते अर्धा तास आतमध्ये जाऊन बसले होते आणि या घटनेचे व्हि़डीओ फुटेजदेखील उपलब्ध असल्याचा दावा लोणीकर यांनी केला आहे. याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचेही लोणीकर यांनी म्हटले आहे. तसेच निवडणूक आयोगाकडे नितीन राऊत यांचे मतदान रद्द करण्याची मागणी करणार असल्याचे लोणीकरांनी सांगितले आहे. त्यामुळे लोणीकरांच्या हि मागणी निवडणूक आयोग मान्य करणार का, हे लवकरच कळेल.

दरम्यान देशभरातील आमदार-खासदारांचे संख्याबळ लक्षात घेतले तर द्रौपदी मुर्मू यांचे पारडे जड असल्याचे चित्र दिसून येत आहे. देशाच्या १५ व्या राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू सहज निवडून येतील, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!