🕒 1 min read
Amit Shah | नवी दिल्ली : अरुणाचल प्रदेशातील तवांग येथे भारत-चीन सैनिकांमध्ये झालेल्या संघर्षावर संसदेत विरोधक आणि सत्ताधारी असा सामना रंगला. या मुद्द्यांवर गृहमंत्री अमित शाह यांनी भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. काँग्रेसच्या राजीव गांधी फाऊंडेशनला चीनी दूतावासाकडून १.३५ कोटी मिळाले होते, असा आरोप अमित शाह यांनी केला आहे. याचा काँग्रेसने खुलासा करावा, अशी मागणी शाह यांनी केली.
गृहमंत्री अमित शाह म्हणाले, भारताच्या १ इंच जमिनीवर कोणीही कब्जा करू शकत नाही. ८ तारखेच्या रात्री आणि ९ तारखेला सकाळी आपल्या जवानांनी दाखवलेल्या शौर्याचे मी कौतुक करतो. लष्कराने काही वेळातच सर्व घुसखोरांचा पाठलाग करून आमच्या भूमीचे रक्षण केले.
काँग्रेसवर निशाणा साधत गृहमंत्री म्हणाले, काँग्रेसच्या काळात १८ किलोमीटर जमीन बळकावण्यात आली होती, मात्र भाजपच्या राजवटीत हे होऊ शकले नाही. प्रश्नोत्तराच्या तासाच्या यादीतील प्रश्न क्रमांक ५ पाहून मला काँग्रेसची चिंता समजली. कारण प्रश्न राजीव गांधी फाउंडेशनचा फॉरेन कॉन्ट्रिब्युशन रेग्युलेशन अॅक्ट (FCRA) परवाना रद्द करण्याबाबत होता.
महाराष्ट्र भाजपने देखील काँग्रेसवर टीका केली आहे. राजीव गांधी ट्रस्टने २००५-०७ या वर्षात चिनी दूतावासाकडून मिळालेल्या १ कोटी ३५ लाख रुपयांचे काय केले? याचे उत्तर काँग्रेसने द्यावे? राजीव गांधी ट्रस्टने जुलै २०११ मध्ये एफसीआरए खात्यातील झाकीर नाईकच्या संस्थेकडून ५० लाख रुपये परवानगीशिवाय का घेतले? हे काँग्रेसने देशाला सांगावे?, असा प्रश्न भाजपने उपस्थित केला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Sushma Andhare | “रामभाऊ, आमचा नाद करू नका, आम्ही मागच्या मागे माणूस आऊट करतो”; सुषमा अंधारेंची तुफान फटकेबाजी
- Hair Care Tips | केसांची वाढ सुधारायची असेल, तर आहारात करा ‘या’ गोष्टींचा समावेश
- Sushma Andhare | “त्यांना महापुरुषांपेक्षा खुर्ची महत्त्वाची वाटत असेल तर…”; सुषमा अंधारेंचा निशाणा कुणावर?
- Udayanraje Bhosale | नूपुर शर्मा यांचं निलंबन, मग राज्यपाल कोश्यारींवर कारवाई का नाही? – उदयनराजे भोसले
- PM Kisan Yojana | सरकारची मोठी घोषणा! ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार नाही पीएम किसान योजनेचा 13 वा हप्ता
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
