Share

Nana Patole : “सत्तेसाठी भाजपचा रावणासारखा अहंकार दिसतोय”; नाना पटोलेंची टीका

Published On: 

🕒 1 min read

Nana Patole । मुंबई : गेल्या महिन्यात राज्याच्या राजकारणात मोठा सत्ताबदल झाला. एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री झाले. तसेच सत्तेवर असलेले शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांना विरोधात बसावं लागलं. मात्र यानंतर भाजप आणि विरोधकांमध्ये चांगलाच शाब्दिक युद्ध सुरु आहे. तसेच एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांची सुरु आहेत. त्यातच आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर निशाणा साधत टीका केली आहे.

सत्तेसाठी भाजप काहीही करु शकते, असे विरोधकांकडून पटवून दिले जात आहे. महाविकास आघाडीच्या अंतर्गत कलहामुळेच ही परिस्थिती आल्याचे भाजपकडून बोलले जात आहे. त्यातच २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे १०५ आमदार असताना सत्तेसाठी त्यांनी केलेले प्रयत्न संबंध राज्याने पाहिले. त्यामधून भाजपचा रावणासारखा अहंकार समोर येत असल्याचा आरोप आता नाना पटोले यांनी केला आहे. पण मतदार हे उघड्या डोळ्याने पाहत असून आगामी निवडणुकांमध्ये याचे परिणाम होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता.

दरम्यान, देशांतील सर्वोच्च अशा राष्ट्रपती पदासाठी आज निवडणूक पार पडणार आहे. एनडीएकडून द्रोपदी मुर्मू तर यूपीएकडून यशवंत सिन्हा यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. मुंबईत विधानभवन येथे सकाळी 10 ते सायंकाळ 5 वाजता दरम्यान मतदान होणार आहे. भाजपा आणि शिंदे शिवसेना गट यासह शिवसेना खासदार यांनी एनडीएच्या उमेदवार द्रोपदी मुर्मू यांना पाठींबा दर्शविला आहे. आज होणा-या या निवडणुकीत खासदार आणि आमदार मतदान करणार आहेत. देशभरातील आमदार-खासदारांचे संख्याबळ लक्षात घेतले तर द्रौपदी मुर्मू यांचे पारडे जड असल्याचे चित्र आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!