मुंबई: आजपासून गरजेच्या अनेक वस्तू महाग होणार आहेत. गेल्या महिन्यात जीएसटी परिषदेच्या बैठकीत अनेक खाद्यपदार्थ व वस्तूंवरील जीएसटी वाढवण्याचा निर्णय घेतला. त्याची अंमलबजावणी आजपासून करण्यात येणार आहे. यामुळे दही, लस्सी, तांदूळ, पीठ, पनीर, मासे यासह अनेक जीवनावश्यक वस्तू महाग होणार आहेत. यावरूनच काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
“मोदी सरकारच्या कृपेने आता मरण ही महाग झाले आहे. मरणाच्या दारावर ही मोदी सरकार टॅक्स वसूल केल्याशिवाय वर जाऊ देणार नाही. भाजपाचे हिंदूत्व आणि राष्ट्रवाद जन्मापासून मृत्यूपर्यंत किती व्यापक आहे हे लक्षात घ्या.”, असे ट्वीट सचिन सावंत यांनी केले आहे.
मोदी सरकारच्या कृपेने आता मरण ही महाग झाले आहे.
मरणाच्या दारावर ही मोदी सरकार टॅक्स वसूल केल्याशिवाय वर जाऊ देणार नाही. भाजपाचे हिंदूत्व आणि राष्ट्रवाद जन्मापासून मृत्यूपर्यंत किती व्यापक आहे हे लक्षात घ्या. pic.twitter.com/5AweMWEnkU— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) July 18, 2022
दरम्यान आजपासून शाळेच्या वस्तूही महागणार आहेत. ब्लेड, कात्री, पेन्सिल शार्पनर, नकाशे, चमचे, काटे चमचे, स्किमर, केक सर्व्हिसवर जीएसटी वाढवला आहे. त्यावर १८% दराने जीएसटी वसूल केला जाईल. तसेच एलईडी बल्बवर १८% जीएसटी आकारण्यात येईल. गोदामात माल ठेवणेही आता महागणार आहे. गोदामात ड्रायफ्रूट्स, मसाले, गूळ, कापूस, चहा, कॉफी इत्यादी ठेवणेही महाग होणार आहेत. त्यांच्यावर १२ टक्के दराने जीएसटी आकारला जाईल.
हॉटेल रूम महागणार-
यापूर्वी १ हजार रुपयांपेक्षा MR कमी किमतीच्या हॉटेलच्या खोल्यांवर जीएसटी नव्हता, आता यावर १२ टक्के जीएसटी लावला जाणार आहे. तसेच रुग्णालयाने ५ हजार रुपयांपेक्षा अधिक दराने खोली उपलब्ध करून दिल्यास त्या खोलीवर १५ टक्के दराने जीएसटी द्यावा यापुढे लागणार आहे.
महत्वाच्या बातम्या:
- Presidential Election : राष्ट्रपती निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीची मतं फुटणार; भाजपाचे स्पष्ट संकेत
- Atul Bhatkhalkar : “मुर्मू यांचा विजय निव्वळ औपचारिकता…”, अतुल भातखळकरांचे मोठे वक्तव्य
- Sanjay Raut : उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी शिवसेना कोणाला पाठिंबा देणार?; संजय राऊत म्हणाले…
- Amol Mitkari : मुख्यमंत्र्यांच्या सत्कार समारंभात महापुरुषांचा अपमान; अमोल मिटकरी आक्रमक!
- Shinde VS Thackeray : शिवसेना-शिंदे गट संघर्ष; ‘त्या’ याचिकेवर बुधवारी होणार सुनावणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

