🕒 1 min read
महाराष्ट्र देशा डेस्क : भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीचा फॉर्म सध्या खराब आहे. अनेक सामने खेळूनही तो मोठी धावसंख्या करू शकलेला नाही. त्यामुळे त्याला अनेक दिग्गजांच्या टीकेला सामोरे जावे लागत आहे. त्याची कामगिरी सातत्याने घसरत असल्यामुळे त्याचे फॅन्स देखील नाराज आहेत. इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात विराट कोहली अवघ्या 17 धावांवर बाद झाला. कोहलीने त्याचे शेवटचे शतक दोन वर्षांपूर्वी 2019 मध्ये केले होते. सर्वजण त्याच्या ७१ व्या शतकाची आतुरतेने वाट बघत आहेत. मात्र अशी कामगिरी करण्यात त्याला यश येत नाहीये. त्यावरूनच आता चित्रपट समीक्षक कमल आर. खान म्हणजेच केआरके याने विराट कोहलीला एक सल्ला दिला आहे.
There is no problem at all for @imVkohli Bhai. If he does announce retirement from cricket, So I will take him as a main villain in my film #DeshDrohi2! Because he like to do drama. Even I will cast #AnushkaSharma as a may lead heroine.
— KRK (@kamaalrkhan) July 17, 2022
केआरकेने ट्विट केले आहे कि, “आता विराट कोहलीने क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करायला काही हरकत नाही, मी त्याला माझ्या ‘देशद्रोही 2’ चित्रपटात मुख्य खलनायक म्हणून कास्ट करेन! कारण त्याला अभिनय करायला खूपच आवडते. याच चित्रपटात मी त्याची पत्नी अनुष्का शर्मा हिला देखील मुख्य अभिनेत्री म्हणून कास्ट करणार आहे.
यासोबत केआरकेने आणखी एका ट्विटमध्ये लिहिले की, “मला गंभीरपणे सांगायचे आहे की विराट कोहली दादा, तुम्ही भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील महान खेळाडूंपैकी एक आहात. तुम्ही भारतातील आणि जगातील नंबर 1 खेळाडू आहात. तुम्ही भारताचे लेजेंड आणि अभिमान आहात. पण आता निरोप घेण्याची वेळ आली आहे. तुम्ही तुमची प्रतिमा डागाळू देऊ नका.”
On the serious note I want to tell to @imVkohli. Bro you are one of the greatest player in Indian cricket history. You are the No.1 player in India and world. You are legend and Pride of India. But now it’s time to say goodbye. You should not destroy your respect and image.????
— KRK (@kamaalrkhan) July 17, 2022
या ट्विट्सवर नेटकऱ्यांनी हजारो रिप्लाय केले आहेत. बहुतांश जणांनी रिप्लाय केले आहेत कि, विराट कोहलीबद्दल बोलू नको. तू तुझ्या चित्रपटावर लक्ष केंद्रित कर. स्वतः फ्लॉप ठरलेल्या माणसाने इतरांविषयी बोलू नये, असा सल्ला देखील काहींनी दिला आहे. तसेच बऱ्याच जणांनी असेही विचारले कि, तुम्ही विराट कोहली आणि अनुष्काला किती फी द्याल.
एका युजरने लिहिले की, विराट कोहली त्याच्या एका जाहिरातीच्या पैश्यात तुमचे संपूर्ण करिअर खरेदी करू शकतो. तुम्ही दुबईत बसून प्रवचन देत आहात, तुम्ही देशासाठी काय केले? देशद्रोही असा चित्रपट करून सगळ्यांची डोकेदुखी वाढवली. तर विराटच्या फॅन्सने रिप्लाय केले आहेत कि, या वाईट वेळेला आणि वाईट लोकांना कोहली त्याच्या बॅटने नक्कीच उत्तर देईल आणि जरी त्याला फिल्म इंडस्ट्रीत जायचे असेल, तर तो फ्लॉप चित्रपटात का काम करेल. कारण तो स्वतःच एक मोठा स्टार आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Presidential Election : राष्ट्रपती निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीची मतं फुटणार; भाजपाचे स्पष्ट संकेत
- Atul Bhatkhalkar : “मुर्मू यांचा विजय निव्वळ औपचारिकता…”, अतुल भातखळकरांचे मोठे वक्तव्य
- Sanjay Raut : उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी शिवसेना कोणाला पाठिंबा देणार?; संजय राऊत म्हणाले…
- Amol Mitkari : मुख्यमंत्र्यांच्या सत्कार समारंभात महापुरुषांचा अपमान; अमोल मिटकरी आक्रमक!
- Shinde VS Thackeray : शिवसेना-शिंदे गट संघर्ष; ‘त्या’ याचिकेवर बुधवारी होणार सुनावणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
