Sanjay Raut । दिल्ली : महाराष्ट्राच्या राजकारणात दिवसेंदिवस अनेक मोठे गौप्यस्फोट होतायत. महाराष्ट्रात सत्ताबदल झाल्यानंतर आता मंत्रिमंडळात कोणाला कोणाला स्थान मिळणार याबाबत मोठ्या चर्चा सुरु आहेत.तसेच सरकार स्थापन होऊन आता १५ दिवस झाले. मात्र अजूनही सरकार स्थापन झालं नाही. आता हाच मुद्दा विरोधी पक्षाने उचलून धरला आहे. यावरून आज पुन्हा एकदा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिंदे सरकारवर आणि भाजपवर निशाणा साधला आहे.
संजय राऊत म्हणाले कि, दोन जणांचं मंत्रिमंडळ 15 दिवसांपासून चाललंय. जगामध्ये लोकशाहीची एवढी चेष्टा कधी झाली नव्हती. प्रश्न एवढाच आहे की, एवढा मोठा तुमचा गट, एवढा मोठा भाजपा, इतकं मोठं बहुमत. मग मंत्रिमंडळ का इतक्या दिवसात स्थापन झालं नाही?, असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे. भविष्यातही मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता कमी दिसते. अपात्रतेची टांगती तलवार आहे. बेकायदेशीर सरकार आहे, असा दावाही राऊत यांनी केला.
दरम्यान, सध्या राज्यात केवळ दोनच व्यक्ती कारभार पाहत आहेत, अशी टीका त्यांनी केली आहे. मंत्रिमंडळ विस्तार हा सर्वस्वी शिंदे-फडणवीस यांचा अधिकार आहे. ते काही विरोधीपक्ष नेत्याचे काम नाही. त्यांच्याकडे पूर्ण बहुमतदेखील आहे. अशावेळी राज्याला मंत्रिमंडळापासून वंचित ठेवणे योग्य नाही. मात्र दुसरीकडे अनेकांना शब्द दिले आहेत. ते पाळले जातील की नाही, अशी शंका त्यांना वाटत असेल, असा टोला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्य सरकारला लगावला होता.
महत्वाच्या बातम्या :
- Sachin Sawant : “भाजपचे हिंदूत्व आणि राष्ट्रवाद जन्मापासून मृत्यूपर्यंत…”, कॉंग्रेसची टीका
- KRK । केआरकेने दिला कोहलीला सल्ला; ‘देशद्रोही 2’ मध्ये काम करण्याची दिली ऑफर
- Presidential Election : राष्ट्रपती निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीची मतं फुटणार; भाजपाचे स्पष्ट संकेत
- Atul Bhatkhalkar : “मुर्मू यांचा विजय निव्वळ औपचारिकता…”, अतुल भातखळकरांचे मोठे वक्तव्य
- Sanjay Raut : उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी शिवसेना कोणाला पाठिंबा देणार?; संजय राऊत म्हणाले…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

