Share

Presidential Election : राष्ट्रपती निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीची मतं फुटणार; भाजपाचे स्पष्ट संकेत

Published On: 

🕒 1 min read

Presidential Election | मुंबई : देशांतील सर्वोच्च अशा राष्ट्रपती पदासाठी आज निवडणूक पार पडणार आहे. एनडीएकडून द्रोपदी मुर्मू तर यूपीएकडून यशवंत सिन्हा यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. मुंबईत विधानभवन येथे सकाळी 10 ते सायंकाळ 5 वाजतादरम्यान मतदान होणार आहे. भाजपा आणि शिंदे शिवसेना गट यासह शिवसेना खासदार यांनी एनडीएच्या उमेदवार द्रोपदी मुर्मू यांना पाठींबा दर्शविला आहे. आज होणा-या या निवडणुकीत खासदार आणि आमदार मतदान करणार आहेत.

देशभरातील आमदार-खासदारांचे संख्याबळ लक्षात घेतले तर द्रौपदी मुर्मू यांचे पारडे जड असल्याचे चित्र आहे. देशाच्या १५ व्या राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू सहज निवडून येतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी द्रौपदी मुर्मू यांना २०० मतं मिळतील असं आश्वासन दिलं आणि काँग्रेस राष्ट्रवादीची मतं फुटणार अशा चर्चांना सुरुवात झाली. या चर्चांना बळ मिळेल, अशीच विधानं आता भाजपा नेत्यांकडून केली जात आहे.

आशिष शेलार, गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील यांनी विधानभवनात केलेल्या विधानांमधून हेच दिसून येत आहे. पक्षमर्यादा झिडकारुन आज द्रौपदी मुर्मु यांच्या समर्थनात मतदान होईल, अशी प्रतिक्रिया भाजपा आमदार आशिष शेलार यांनी दिली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मतं द्रौपदी मुर्मू यांना मिळणार आहेत, असं विधान गिरीश महाजन यांनीही केलं आहे.

दरम्यान, उपराष्ट्रपती पदासाठी येत्या ६ ऑगस्टला निवडणूक होणार आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या माहितीनुसार, 19 जुलै ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!