🕒 1 min read
मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि शिवसेनेचे इतर आमदार यांनी शिवसेनेशी बंड करत काही दिवसांपूर्वी गुवाहाटीला मुक्काम ठोकला होता. गुवाहाटी ट्रीप महाराष्ट्राच्या राजकारणाला अनेक वळणे देणारी ठरली. ही राजकीय ट्रीप इतिहासात कायम स्मरणात ठेवली जाईल, कारण गुवाहाटीतून आल्यानंतर एकनाथ शिंदे यांना थेट मुख्यमंत्रीपद मिळाले. मात्र या ट्रीपवरूनच एका चिमुकलीने मुख्यमंत्री शिंदेंकडून एक अजब प्रॅामिस घेतले आहे.
अन्नदा डामरे (Annada Damre) ही चिमुकली काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांच्या नंदनवन बंगल्यावर भेटळी. यानंतर तिने मुख्यमंत्र्यांकडून एक अजब प्रॉमिस घेतले. येणा-या दिवाळीच्या सुट्टीत तुम्ही मला गुवाहाटीला फिरायला घेवून जाणार ना? हे प्रॉमिस मागितल्यावर उपस्थितांमध्ये एकच हशा उमटला. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी कामाख्या देवीचे दर्शन घ्यायला जायचे न असे विचारत तिला आपण नक्कीच जाऊ असे म्हटले.
दरम्यान रत्नागिरी जिल्ह्यातील डेरवणच्या विठ्ठलराव जोशी चॅरिटीज आणि ट्रस्ट इंग्लिस मिडीयम स्कुल येथे शिकणाऱ्या अन्नदा डामरे या चिमुकलीचा हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. तिचे प्रश्न आणि मासुमता सर्वांनाच भुरळ घालते. दरम्यान शिंदे यांनी राज्यात सरकार स्थापन केले आहे. मात्र शिवसेना आणि शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात केलेल्या याचिकांवर अजून सुनावणी होणे बाकी आहे. दरम्यान बुधवारी (२० जुलै) सरन्यायाधीश रमण, न्या. कृष्णा मुरारी आणि न्या. हिमा कोहली यांच्या खंडपीठापुढे शिवसेनेतील बंडखोरी ते राज्यातील सत्तांतर आणि विधानसभेतील बदलांची कायदेशीर वैधता यावर सुनावणी होईल.
‘या’ दोन मुद्द्यांवर न्यायालय काय निर्णय देणार?
गटनेता आणि प्रतोद नेमण्याचे अधिकार बहुसंख्य आमदार असलेल्या गटाला आहेत कि, मूळ पक्षाला आहेत हा सर्वांत महत्वाचा मुद्दा असून दुसरा म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या बरोबरचे आमदार आहेत तोच विधिमंडळ पक्ष आहे कि दोन तृतीयअंश आमदार बाहेर पडल्यामुळे तो वेगळा गट निर्माण झाला आहे. यासंदर्भात न्यायालय काय निर्णय देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- Sanjay Raut : एवढा मोठा गट, एवढा मोठा भाजप, एवढं मोठं बहुमत, मग मंत्रिमंडळाचा विस्तार का नाही?; राऊतांचा सवाल
- Sachin Sawant : “भाजपचे हिंदूत्व आणि राष्ट्रवाद जन्मापासून मृत्यूपर्यंत…”, कॉंग्रेसची टीका
- KRK । केआरकेने दिला कोहलीला सल्ला; ‘देशद्रोही 2’ मध्ये काम करण्याची दिली ऑफर
- Presidential Election : राष्ट्रपती निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीची मतं फुटणार; भाजपाचे स्पष्ट संकेत
- Atul Bhatkhalkar : “मुर्मू यांचा विजय निव्वळ औपचारिकता…”, अतुल भातखळकरांचे मोठे वक्तव्य
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
