🕒 1 min read
मुंबई : एजबॅस्टन येथे खेळल्या गेलेल्या भारत आणि इंग्लंड (ENG vs IND) यांच्यातील दुसऱ्या टी-२० सामन्यात माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी देखील उपस्थित होता. यादरम्यान धोनीने युवा खेळाडूंना महत्त्वाच्या टिप्स दिल्या. बीसीसीआयने धोनीचे काही फोटो शेअर केले आहेत ज्यात तो टीम इंडियाच्या खेळाडूंशी बोलताना दिसत आहे.
धोनी अनेकदा युवा खेळाडूंना सल्ले देताना दिसतो. आयपीएलमध्ये तो अनेकदा असे करताना दिसला आहे. चेन्नई सुपर किंग्जच्या प्रत्येक सामन्यानंतर मग तो त्याचा संघ असो किंवा विरोधी, तो युवा खेळाडूंसोबत गप्पा मारताना दिसत होता. बीसीसीआयने धोनीचा फोटो शेअर केला लिहिले, ”जेव्हा एमएस धोनी बोलतो तेव्हा सगळे ऐकतात.”
Always all ears when the great @msdhoni talks! ???? ????#TeamIndia | #ENGvIND pic.twitter.com/YKQS8taVcH
— BCCI (@BCCI) July 9, 2022
भारताने दुसऱ्या टी-२० सामन्यात इंग्लंडचा ४९ धावांच्या मोठ्या फरकाने पराभव करत मालिकेत २-० अशी अभेद्य आघाडी घेतली. आता या मालिकेत आणखी एक सामना शिल्लक आहे. प्रथम खेळताना टीम इंडियाने ८ गड्यांच्या मोबदल्यात १७० धावा केल्या. प्रत्युत्तरात खेळताना इंग्लंडचा संघ १७ षटकांत १२१ धावा करून ऑलआऊट झाला. भारतीय संघाच्या या विजयाचे हिरो होते वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराह.
महत्त्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
