Share

Uddhav Thackeray : धनुष्यबाण शिवसेनेपासून कोणीही वेगळा करू शकत नाही – उद्धव ठाकरे

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : दिवसेंदिवस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यातील संघर्ष वाढत चालला आहे. यानंतर आज दुपारी २ वाजता उद्धव ठाकरे यांनी लाईव्ह येत पत्रकारांशी संवाद साधला. तसेच त्यांनी अनेक मुद्द्यावर भाष्य केलं. यावेळी शिवसेना कोणाची?, धनुष्यबाण हे चिन्ह कोणाचं?, याबाबत देखील उद्धव ठाकरे यांनी आज भाष्य केलं.

कायद्यानुसार शिवसेनेचं चिन्ह धनुष्यबाण हा कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. त्यामुळं याबाबत शिवसैनिकांनी मनात कोणताही संभ्रम ठेऊ नये, हे मी घटनातज्ज्ञांशी बोलून तुम्हाला सांगतो आहे, असा विश्वास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिला आहे. तसेच चिन्हाबाबतची चिंता सोडा. लोक धनुष्यबाणचं नव्हे तर उमेदवारही पाहतात, असं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, याआधी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. राऊत म्हणाले कि, हिंदूत्वावादी म्हणून घेणाऱ्या ४० जणांनी भूमिका स्पष्ट करावी. जी पुन्हा उभी राहणार आहे ती खरी शिवसेना. मातोश्री माझी, शिवसेना माझी…असं म्हणाणाऱ्यांनी स्वतः सर्व निर्माण कराव. शिवसेना अजुनही भक्कम आहे. धनुष्यबाण हे शिवसेनेचे आहे आणि सेनेचेच राहणार अशी स्पष्ट भूमिका राऊत यांनी व्यक्त केली.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!