Share

Kangana Ranaut : “घरात घुसून मारलं होतं ना…”, करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’वर निशाणा साधत कंगनाची ‘ती’ पोस्ट चर्चेत

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : अभिनेत्री कंगना रणौत कायम कोणत्या ना कोणत्या करणामुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. कंगना आणि करण जोहर या दोघांचा एकमेकांशी ३६ चा आकडा आहे हे सर्वांनाचं माहिती आहे. ते दोघे आधी एकमेकांशी खूप चांगले वागायचे पण कारणच्या ‘कॉफी विथ करण’ या शोमध्ये कंगनाने उपस्थिती लावल्यापासून त्यांच्या वादाला सुरवात झाली.

करणने अभिनेत्री कंगणाला कॉफी विथ करण’च्या पाचव्या सिझन मध्ये आमंत्रित केले होते. यावेळी कंगणाने करणवर बॉलिवूडमध्ये घराणेशाहीला प्रोत्साहन देण्याचा आरोप केला होता. आता करण चा हा शो नव्या सिझनसाठी ओटीटीवर येणार आहे. त्यानिमित्ताने कंगणाने पुन्हा एकदा करण जोहरवर निशाण साधला आहे. तिने याबाबत एक पोस्ट देखील लिहिली आहे. सध्या तिची पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आहे.

कंगनाने सोशल मीडियावर करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’वर निशाणा साधत एक पोस्ट लिहिली आहे. कंगणाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर स्वतःचा फोटो पोस्ट करत लिहिले की, “पापा जो (करण जोहर) आज OTT वर त्याच्या सर्व प्रसिद्ध कॉफी विथ करणच्या एपिसोड्सची जाहिरात करत आहे. पापा जोला शुभेच्छा, पण या एपिसोडचं काय, अरे माफ करा! सर्जिकल स्ट्राइक, घरात घुसून मारलं होतं ना. माझा एपिसोड हा त्याचा सर्वात लोकप्रिय एपिसोड होता आणि त्यानंतर त्याच्यावर टीव्हीवर बंदी घालण्यात आली”.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!