Supriya Sule : “उज्ज्वला योजनेच्या नावाखाली सरकारने…”, सुप्रिया सुळेंचा आरोप

मुंबई: उज्ज्वला गॅस योजनेखाली ८ कोटी गोरगरीब जनतेला मोफत कनेक्शन देण्याची घोषणा केंद्र सरकारने केली. त्यातील सुमारे ६ कोटी कनेक्शन देण्यात आल्याचा दावा सरकारकडून करण्यात येतो. पण गॅसच्या दरात सातत्याने वाढ करण्यात येत आहे. नुकतेच आणखी ₹५० ची वाढ केल्याने सिलिंडर हजार रुपयांच्या पार गेले. यावरच राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.

सिलिंडरच्या वाढत्या दरांमुळे उज्ज्वला गॅस योजनेच्या सहा कोटी लाभार्थ्यांपैकी सुमारे ३ कोटी ५९ लाख लाभार्थ्यांनी कनेक्शन घेतल्यानंतर सिलिंडर घेतलेच नसल्याचे उघड झाले आहे. गोरगरीबांना दिलासा देण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या या योजनेच्या नावाखाली सरकारने आपली पाठ थोपटून घेतली. अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

केंद्र सरकारने मोठे दावे केले, पण ही योजना फसली असून त्याचे क्रेडीट याच सरकारने सातत्याने केलेल्या दरवाढीला आहे. माझी केंद्र सरकारला नम्र विनंती आहे की, कृपया आपण या देशातील जनतेला महागाई आणि गॅसच्या दरवाढीपासून दिलासा देण्यासाठी ठोस पावले उचलावी. असेही सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या: